loader image
[ays_poll id=7]

राशी भविष्य : ११ ऑक्टोबर २०२२ – मंगळवार

Oct 11, 2022


मेष: आज ”कमी वेळात अधिक लाभ” अशा एखाद्या योजनेत आपली फसवणूक होण्याची शक्यता असल्याने सावध राहावे लागेल. कोर्ट- कचेरीच्या प्रकरणात अडकू नका. आज कोणाला जामीन राहू नका. आज मनाची एकाग्रता कमी राहील.

वृषभ: आज घर व संतती ह्यांच्याशी संबंधित एखादी चांगली बातमी मिळेल. जुन्या परंतु बालपणीच्या मित्रांच्या सहवासाने मनाला आनंद होईल. नवीन मैत्री सुद्धा होईल. व्यावसायिक व आर्थिक लाभ होईल. तरीही दुपार नंतर सांभाळून राहावे लागेल.

मिथुन: जचा दिवस व्यापारासाठी शुभ फलदायी आहे. व्यापारी लोकांना व्यवसायवृद्धी बरोबरच यश मिळेल व येणी वसूल होतील. वडील आणि वडीलधार्‍यांकडून लाभ होईल. अर्थ प्राप्ती संभवते. नोकरीत वरिष्ठांची मर्जी संपादन करू शकाल.

कर्क: आजच्या दिवसाचा प्रारंभ मानसिक तणाव व बेचैनीने होईल. शारीरिक दृष्टया आळस व मरगळ जाणवेल. पोटाचा त्रास संभवतो. कोणत्याही कार्यात नशिबाची साथ लाभणार नाही. संतती विषयक चिंता वाढेल.

सिंह: आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. आचार विचारांवर संयम ठेवून अवैध गोष्टींपासून दूर राहणे हितावह राहील. मानसिक व शारीरिक त्रास वाढतील. त्यामुळे प्रकृती बिघडेल. अचानक धनलाभ होईल.

कन्या: आजचा सकाळचा वेळ मित्रांसोबत फिरणे, खाणे – पिणे व मनोरंजन ह्यात आनंदाने घालवाल. भागीदारांशी संबंध चांगले राहतील. दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल. प्रकृतीस त्रास संभवतो. एखाद्या आजारावर अचानकपणे खर्च करावा लागेल.

तूळ: आज आपण दृढ मनोबल व आत्मविश्वासामुळे प्रत्येक कामात यशस्वी व्हाल. कौटुंबिक जीवनात सुख – शांती लाभेल. शारीरिक स्वास्थ्य उत्तम राहील. स्वभाव उग्र बनेल. सबब वाणीवर नियंत्रण ठेवा. दुपार नंतर परिस्थितीत बदल होऊन आपण मनोरंजनाचा विचार कराल.

वृश्चिक: आज आपल्यातील मानसिक हळवेपणा वाढेल. मानसिक समतोल साधावा लागेल. अभ्यास व कारकीर्द ह्या संबंधी कामात विद्यार्थ्यांना यश मिळेल. आपली कल्पनाशक्ती व साहित्य निर्मिती ह्यात नावीन्य दिसेल.

धनु: आज कौटुंबिक शांतता राखण्यासाठी निरर्थक वाद – विवाद टाळणे हितावह होईल. आईची तब्बेत बिघडण्याची शक्यता आहे. धन व प्रतिष्ठेची हानी होण्याचा संभव आहे. दुपार नंतर स्वभावातील हळुवारपणा वाढेल.

मकर: आज महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी दृढ व स्थिर विचार ह्यांना अग्रस्थान द्यावे लागेल. मित्र व प्रिय व्यक्तीच्या भेटीमुळे आनंद वाटेल. एखाद्या प्रवासाचा बेत आखाल. भावंडांशी जवळीक वाढेल. दुपार नंतर मात्र अप्रिय घटनांमुळे आपले मन अस्वस्थ होईल.

कुंभ: आज वाद होऊन कटुता निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे राग व वाणी ह्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. मनात नकारात्मक विचारांना थारा देऊ नका. खाण्या – पिण्यात संयम बाळगा. दुपार नंतर वैचारिक स्थैर्य लाभेल.

मीन: शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहिल्याने आपण उत्साहित राहाल. नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल आहे. कुटुंबीयांसह वेळ आनंदात घालवाल. दुपार नंतर मात्र मनावर संयम ठेवा.


अजून बातम्या वाचा..

.