loader image
[ays_poll id=7]

नांदगाव येथे जलसा- ए- आम सिरतून्नबी” कार्यक्रम संपन्न

Oct 13, 2022


नांदगाव – हजरत मोहम्मद पैगंबर साहेबांच्या चरित्राचे परिचय करून देण्याकरीता आमदार सुहास आण्णा रहेनुमा फाउंडेशनच्या वतीने “जलसा- ए- आम सिरतून्नबी” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.नांदगाव शहरातील तसेच परिसरातील अनेक मुस्लीम बांधवांनी कार्यक्रमात आवर्जून हजेरी लावली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मौलाना अकिल मिल्ली होते. संमेलनात कार्यक्रमांचे प्रमुख वक्ते हजरत मौलाना मुख्तार सईद मदनी यांनी सौम्य वक्तृत्व शैलीत प्रवचन देत पैगंबर साहेबांच्या जीवनातील सामजिक, शैक्षणिक, पारिवारिक, व्यावहारिक कार्यपद्धती सभोवतालच्या लोकांशी आपल्या सहकाऱ्यांशी वागणूक ,मुहम्मद पैगंबर साहेबांची खरी शिकवण काय आहे,संस्कार, शेजारधर्म,देशप्रेम इत्यादींवर प्रवचन देत आजच्या काळाची गरज शिक्षणाचे महत्व, सामाजिक कार्याचे महत्त्व, पैगंबर साहेबांनी आपल्या संपुर्ण आयुष्यात अनाथ गोर गरीब , गरजवंत लोकांंची नेेहमी कशी मदत केेली याची आठवण करून दिली. आजच्या तरुण पिढीने व्यसनाच्या आहारी जाऊन आपले व देशाचे भविष्य बरबाद करू नये, पालकांनी मुलावर लक्ष देणे गरजेचे आहे, मोबाईलचा जास्त उपयोग टाळावा समाजात एकोपा कसा टिकून राहील याकरिता इतर धर्मीय बांधवांशी चांगली वागणूक, आपल्या आचरणाने तसेच सामाजीक कामे करून लोकांची मने कशी जिंकता येते यावर बोलताना त्यांच्या जीवनातील काही अनुभव सांगितले मौलानानी आपल्या सौम्य प्रवचनातून एका तासभराच्या अवधीत श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.कार्यक्रमाच्या शेवटी हजरत मौलानानी आपल्या देशात व सर्वांच्या आयुष्यात सुख, शांती ,समृध्दी, एकोपा टिकून रहावा अशी दुआ करत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.सुत्रसंचलन मुफ्ती फहीम यांनी केले, कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी फाउंडेशनचे अध्यक्ष सईद शेख, सचिव अयाजभाई शेख, नईम हनीफ, रियाज पठाण,इम्रान नॉव्हेल्टि वसीम खान, अक्रम मोमीन, इकबाल, अमजद पठाण,नसीर , इम्रान, रमिज कुरैशी, नदीम तांबोळी,इम्तियाज गांधी इत्यादींनी मेहनत घेतली.


अजून बातम्या वाचा..

ग्रंथालयांच्या अडचणी सोडवण्यासाठी शासन प्रयत्नशील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

ग्रंथालयांच्या अडचणी सोडवण्यासाठी शासन प्रयत्नशील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

  पुणे - जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत ग्रंथालयांना अनुदान उपलब्ध करून देण्यासाठी, शासन प्रयत्न...

read more
आंतरराष्ट्रीय खेळाडू मुकुंद संतोष आहेर साईराज राजेश परदेशी यांना महाराष्ट्र शासनाचा जिल्हा गुणवंत खेळाडू पुरस्कार जाहीर

आंतरराष्ट्रीय खेळाडू मुकुंद संतोष आहेर साईराज राजेश परदेशी यांना महाराष्ट्र शासनाचा जिल्हा गुणवंत खेळाडू पुरस्कार जाहीर

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धांमध्ये सातत्याने उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मनमाड...

read more
मनमाड येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध.

मनमाड येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध.

मनमाड, दि. २५ एप्रिल २०२५: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच घडलेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याचा...

read more
पहलगाम घटनेचा मनमाड क्रिकेट प्रीमियर लीग च्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला

पहलगाम घटनेचा मनमाड क्रिकेट प्रीमियर लीग च्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला

दिनांक २२/०४/२०२५ रोजी जम्मू काश्मीर राज्यातील पहलगाममधिल बैसरण येथे विदेश.देशभरातिल राज्यातून...

read more
भीमोत्सव समिती आयोजित प्रसिद्ध खंजिरी वादक मीरा उमप यांच्या गीतांची मैफल संपन्न

भीमोत्सव समिती आयोजित प्रसिद्ध खंजिरी वादक मीरा उमप यांच्या गीतांची मैफल संपन्न

मनमाड - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भीमोत्सव आयोजन समितीच्या वतीने आयोजित करण्यात...

read more
.