loader image

नाशिक वाहतूक पोलीस आणि अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल तर्फे रस्ते अपघातांबाबत जनजागृती

Oct 17, 2022


जागतिक ट्रॉमा दिनानिमित्त मेडिकव्हर हॉस्पिटल्स आणि नाशिक पोलिसांच्या सहकार्याने जनजागृती अभियान राबविण्यात आले.

नाशिक प्रतिनिधी : जागतिक ट्रॉमा दिनानिमित्त माननीय पोलीस आयुक्त श्री जयंत नाईकनवरे यांच्या अध्यक्षतेखाली व पोलीस उपायुक्त श्री अमोल तांबे यांच्या मार्गदर्शना खाली अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल व नाशिक वाहतूक पोलिसांच्या सहकार्याने शहरातील ट्रॅफिक सिग्नलवर रस्ते अपघातांबाबत जनजागृती अभियानाचे आयोजन केले होते.
या प्रसंगी नाशिक चे सुप्रसिद्ध मेंदू व मणके विकार शस्त्रक्रिया तज्ञ म्हणाले की, रस्ते अपघातात मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. अतिवेग, हेल्मेट नसणे, सीट बेल्ट न लावणे अशा कारणांमुळे अनेकांना रस्ते अपघातात जीव गमवावा लागत आहे. ९० टक्के मृत्यू हे योग्य सुरक्षा मानकांच्या अभावामुळे होतात. प्रत्येकाचे जीवन खूप मौल्यवान आहे आणि आपण सर्वांनी योग्य सुरक्षा मानकांचे पालन करणे आणि इतरांना शिक्षित करणे आवश्यक आहे.
इमर्जन्सी मेडिसिन विभागाचे प्रमुख डॉ.चंद्रकांत चव्हाण म्हणाले की, देशात रस्ते अपघातात सर्वाधिक मृत्यू होत असल्याने लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी आम्ही या जागतिक ट्रॉमा दिनानिम्मित जनजागृती अभियान राबवत आहोत. आम्ही हा दिवस दुखापती आणि मृत्यू कमी करण्यासाठी तसेच देशभरात आणि जगभरातील वेदनादायक घटनांचे परिणाम कमी करण्यासाठी साजरा करतो. रस्ते अपघात हे जगभरात अत्यंत क्लेशकारक अनुभवांचे एक सामान्य कारण मानले जाते.
मेडिकल डायरेक्टर डॉ सुशील पारख उपस्थित समूहाचे मार्गदर्शन करताना म्हणाले कि , योग्य वैद्यकीय माहितीशिवाय, रुग्ण आपत्कालीन परिस्थितीत आमच्या विभागात येतात. आमची टीम तात्काळ उपचाराला प्राधान्य देते , तथापि, सर्व पैलूंमध्ये आघाताच्या तीव्रतेचे मूल्यांकन करणे आणि जीव वाचवण्यासाठी त्वरित चांगले उपचार प्रदान करणे हे एक जवाबदारीचे आणि आव्हानात्मक काम आहे .
या कार्यक्रमाला नाशिक पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी ,मेंदू व मणके विकार शस्त्रक्रिया तज्ञ डॉ.शेखर चिरमडे, सांधेबदल शस्त्रक्रिया तज्ञ डॉ.प्रणित सोनवणे, स्रिरोग व प्रसुतीशास्र तज्ञ डॉ प्रणिता संघवी, केंद्र प्रमुख समीर तुळजापूरकर , व अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलचे इतर वैद्यकीय कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


अजून बातम्या वाचा..

अश्विन मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 10/020/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

अश्विन मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 10/020/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
.