loader image

मनमाड शहरातील खड्डेमय रस्त्यांप्रश्र्नी राष्ट्रवादी आक्रमक ; केला न पा प्रशासनाचा निषेध

Oct 19, 2022


मनमाड – बुधवार दिनांक 19/10/2022 रोजी मनमाड राष्ट्रवादी काँग्रेस मनमाड शहर शाखेच्या वतीने मनमाड शहरातील व एफ सी आय रोडवरील रस्त्याला पडलेले मोठमोठे खड्डे व परिसरातील नागरिकांना होणारा त्रास दुर व्हावा यासाठी पक्षाच्या वतीने खड्ड्यात झाड लावून निषेध नोंदविण्यात आला. मनमाड शहरात गेल्या सहा महिण्यात झालेले रस्त्यांची कामे व त्याची झालेली दुर्दशा याची नगरपालिका प्रशासनाने चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली. त्याचप्रमाणे एफ सी आय रोडवर वाढलेल्या वाहतुकी मुळे तसेच नागरिकांना एफ सी आय रोडवर लागलेल्या गाडयांची पार्किंग व या पासुन होणारा त्रास कमी व्हावा व या लागलेल्या गाडयांचे ड्रायव्हर व सहचालक रिकाम्या वेळेत मद्यप्राशन व जुगारीचे डाव रचने व टोळ्या टोळक्याने बाजुला बसने यावर त्वरित प्रशासनाने आळा घालावा अशी एफ सी आयच्या अधिकार्यांकडे मागणी करण्यात आली. नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास होतो यासाठी प्रशासनाने त्वरित याकडे लक्ष घालावे अन्यथा राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी उग्र स्वरूपाचे आंदोलन उभारेल असा इशारा पक्षा कडून देण्यात आला याप्रसंगी शहर अध्यक्ष दिपक गोगड ,कार्य अध्यक्ष नाना शिंदे , महिला अध्यक्ष अर्पना देशमुख,सेवादल जिल्हाअध्यक्ष राजेंद्र जाधव , अल्पसंख्यक तालुका अध्यक्ष हबीब शेख, मा नगरअध्यक्ष प्रकाश बोधक , कांग्रेसचे नगरसेवक मिलिंद उबाळे ,योगेश जाधव, संदीप पाटील,अमोल गांगुर्डे ,अमोल काळे , कुणाल बच्छाव, शुभम गायकवाड,संदीप जगताप,श्रीराज कातकडे ,किसन जगधने, अक्षय देशमुख,माया झाल्टे ,नैना ओहोळ,चांदेकर ताई व कार्यकर्ता उपस्थित होते.

 


अजून बातम्या वाचा..

अश्विन मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 10/020/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

अश्विन मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 10/020/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
.