मनमाड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने डोणगाव रोड येथील आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना दिवाळी निमित्त फराळ वाटप करण्यात आले. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आनंद बोथरा यांचे वतीने दरवर्षी दिवाळी निमित्त या विद्यार्थ्यांना फराळ वाटप करण्यात येतो. यंदाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष्याच्या माध्यमातून सदर उपक्रम राबविण्यात आला. यावेळी संस्थेतर्फे राष्ट्रवादी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत करण्यात आले. मनमाड शहराध्यक्ष दीपक गोगड, कार्याध्यक्ष नाना शिंदे यांनी बालगोपालाना मार्गदर्शन केले तसेच मनमाड शहरात असेच लोकोपयोगी व विधायक उपक्रम राबविण्याचा मानस बोलून दाखविला. सदर उपक्रमाबद्दल संस्था तसेच विद्यार्थ्यांनी आयोजकांचे आभार मानले. यावेळी राष्ट्रवादी शहराध्यक्ष दीपक गोगड, शहर कार्याध्यक्ष नाना शिंदे, महिला अध्यक्ष अपर्णा देशमुख, अहमदनगर येथील प्रसिद्ध व्यापारी ईश्वर सुराणा, सखाराम पंडित, ओबीसी जिल्हाध्यक्ष राजाभाऊ जाधव, योगेश जाधव, अमोल गांगुर्डे, संदीप पाटील, श्रद्धा आहिरे, माया झाल्टे, पवन आहिरे, अक्षय देशमुख, संदीप जगताप, शुभम गायकवाड आदि उपस्थित होते. संस्थेतर्फे पवार सर व पगार सर यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे संयोजन आनंद बोथरा यांनी केले होते.

राशी भविष्य : ११ ऑक्टोबर २०२५ – शनिवार
मेष : भाग्यकारक घटना घडेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. वृषभ : काहींना...