loader image
[ays_poll id=7]

जे. टी. कासलीवाल इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये आकाश कंदील बनवण्याची अनोखी कार्यशाळा संपन्न

Oct 20, 2022

नांदगाव सोमनाथ घोंगाणे

शहरातील जे. टी. कासलीवाल इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये आकाश कंदील बनवण्याची अनोखी कार्यशाळा संपन्न झाली या उपक्रमाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. शाळेतील कलाशिक्षक निलेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या संख्येने या उपक्रमात विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विशेष म्हणजे ही कार्यशाळा पर्यावरण पूरक होती. कागदापासून बनविलेल्या आकाश कंदील मुलांना बनवण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आले. या मागचा दृष्टिकोन म्हणजे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा व त्याचबरोबर आपल्या कलेच्या माध्यमातून पर्यावरणाचे रक्षण व त्याची जपवणूक व्हावी हा होता. या उपक्रमात जवळजवळ 200 विद्यार्थ्यांनी अतिशय सुरेख असे आकाश कंदील बनवून आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. या कार्यक्रमास संस्थेचे पदाधिकारी श्री जुगल किशोर अग्रवाल व स्कूलचे प्राचार्य श्री मनी चावला उपस्थित होते.
शाळेने राबविलेल्या या उपक्रमाचे संस्थेचे चेअरमन सुनीलकुमार कासलीवाल ,सचिव विजय चोपडा, सरचिटणीस प्रमिलाताई कासलीवाल, जुगलकिशोर अग्रवाल, रिखबचंद कासलीवाल, महेंद्र चांदिवाल प्रशासकीय प्रमुख प्रकाश गुप्ता, स्कूलचे प्राचार्य मनी चावला यांनी कौतुक केले .व सर्व विद्यार्थ्यांना दिवाळीनिमित्त शुभेच्छा दिल्या.
हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी। सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक यांनी विशेष परिश्रम घेतले.

अजून बातम्या वाचा..

मनमाड शहर भाजपा मंडल तर्फे 79 व्या स्वातंत्र्य दिना निमित्ताने ध्वजारोहण कार्यक्रम व भव्य तिरंगा रॅली चेआयोजन युवकांचा उस्फुर्त प्रतिसाद

मनमाड शहर भाजपा मंडल तर्फे 79 व्या स्वातंत्र्य दिना निमित्ताने ध्वजारोहण कार्यक्रम व भव्य तिरंगा रॅली चेआयोजन युवकांचा उस्फुर्त प्रतिसाद

भारतीय जनता पार्टी मनमाड शहर मंडलाच्या वतीने स्वतंत्र हिंदुस्थान च्या 79 व्या स्वातंत्र्य दिना...

read more
मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला....

read more
नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या शहर पातळीवरील शालेय देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेला भरघोस प्रतिसाद

नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या शहर पातळीवरील शालेय देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेला भरघोस प्रतिसाद

मनमाड -- नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात...

read more
.