नांदगाव सोमनाथ घोंगाणे
महाराष्ट्र शासना मार्फत गोरगरीब जनतेसाठी दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्याच्या हेतूने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री.एकनाथजी शिंदे व उप मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवाळी भेट (फक्त 100 रुपयांमध्ये ४ वस्तूचे किट) देण्याचे जाहीर केले होते.
आज मनमाड शहरातील कार्डधारकांना आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या पाठपुराव्याने मनमाड शहर शिवसेना कोअर कमिटी च्या उपस्थितीत या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. लाभार्थी कुटुंबीयांना दीपावली किट चे वाटप करण्यात आले, या मध्ये तेल, चणाडाळ,साखर व रवा या वस्तूचा समाविष्ट आहे.
या प्रसंगी पुरवठा विभागाचे शिंदे साहेब तसेच शिवसेना मनमाड शहर कोअर कमिटी चे राजाभाऊ भाबड, सुनील हांडगे, मयूर बोरसे, अमीन पटेल, वाल्मीक आप्पा आंधळे, गालिब शेख, सुभाष माळवतकर, असिफ पहेलवान, विकास पिंटू वाघ, महेंद्र गरुड, मुकुंद झाल्टे, दादा घुगे, अनिल पगार, संजय नागरे, आप्पा कांदे, सिद्धार्थ छाजेड, सचिन दरगुडे, निलेश व्यवहारे, कुणाल विसापूरकर, नंदू पीठे, महिला आघाडी च्या संगीताताई बागुल विद्याताई जगताप सरलाताई घोगल पूजाताई छाजेड उपस्थित होते.