loader image
[ays_poll id=7]

नांदगाव महाविद्यालयात वैद्यकीय तपासणी शिबिरास प्रतिसाद

Oct 20, 2022

नांदगाव सोमनाथ घोंगाणे

राष्ट्रीय सेवा योजना ही महाविद्यालयीन तरुण, तरुणींसाठी व्यक्तीमत्व विकास घडविण्याबरोबरच आरोग्य संपन्न जीवन जगायला लावणारी योजना आहे.महाविद्यालयीन तरुणांचे आरोग्य हित लक्षात घेता प्रत्येक विद्यार्थ्याला आपआपले रक्त गट माहिती असणे आवश्यक आहे. तसेच हिमोग्लोबिन माहित असणे आवश्यक आहे. म्हणून येथील कला, वाणिज्य विज्ञान महाविद्यालय व नांदगाव ग्रामीण रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात रक्तगट तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.यात १९७ विद्यार्थ्यांनी रक्तगट व हिमोग्लोबिन तपासणीत सहभाग नोंदविला. यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.एन. शिंदे, उपप्राचार्य डॉ. प्रा. संजय मराठे,यांचे मार्गदर्शन लाभले. ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. ख्याती तुसे,अजय भदाणे, नवाज शेख,मृणाल शेंद्रे, अमोल हिरे,ओम गरुड, राम शिंदे,शाम काळे, यांनी विशेष परिश्रम घेतले. तर राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख प्रा. बालाजी मोरे,सह प्रमुख प्रा. संदिप दौंड, श्रीमती कौशल्या बागुल, सायन्स इन्चार्ज डॉ. भागवत चवरे, डॉ.एम.पी.दुसिंग, प्रा.राहुल त्रंबक बिन्नर,प्रा.किशोर निकम आदी यावेळी उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

मनमाड (प्रतिनिधी), ता. २० – त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील...

read more
मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

  मनमाड - शहरात गेली 29 वर्ष कार्यरत असलेली व मनमाड शहराची अर्थ वाहिनी असलेल्या प्रगती अर्बन...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

मनमाड - BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
.