मनमाड- येथील वेणूनाद थिएटर्स प्रस्तुत ऑर्केस्ट्रा स्मॅश बिट्स च्या वतीने दि 20 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7 वा नेहरू भवन येथे कुमार सानू यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या गाजलेल्या गाण्यांचा कार्यक्रम संपन्न झाला.90 च्या दशकातील त्यांची अनेक गाजलेली गाणी सादर करण्यात आली.या प्रसंगी सानू यांच्या रसिक चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली.मनमाड शहरातील अनेक संगीत प्रेमी आवर्जून उपस्थित होते.या प्रसंगाचे औचित्य साधून मनमाड शहरातील गुणी गायक कलावंत शास्त्रीय गायिका सौ सोनम मंदार ढोबळे त्याचप्रमाणे मनमाड शहरातील सर्वात कमी वयाची शास्त्रीय गायिका नंदिनी पाटील यांना मनमाड भूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर कु आम्रपाली पाटील यांना सर्वोत्कृष्ट गायिकेचा पुरस्कारही बहाल करण्यात आला.अर्णव ढोबळे या चिमुकल्या कलाकाराच्या बासरी वादनाने रसिकांची मने तृप्त केली.
मनमाड येथील शास्त्रीय गायनाचे शिक्षक मा सुनील खांगळ सर,मा.विकासदादा काकडे,संदीप देशपांडे सर,कैलास दादा खैरे,विजयकुमार गांगुर्डे,स्वाती मुळे, श्री प्रमोद मुळे आदी मान्यवर उपस्थित होते.तर पत्रकार अमोल जी खरे,निलेश जी वाघ,अशोक जी बिदरी,योगेश जी म्हस्के आदी मान्यवर आवर्जून उपस्थित होते.
मनमाड मधील संगीत रसिकांना उत्तमोत्तम कार्यक्रमाच्या मेजवान्या देण्यास आम्ही वचनबद्ध राहू असे प्रतिपादन ऑर्केस्ट्रा स्मॅश बिट्स चे संघटक मा श्री सुरेंद्र भुजंग,देवेंद्र गवांदे,सुभाष धिंगाण,आम्रपाली पाटील,वर्ष मुळे यांनी केले.
कार्यक्रमाच्या सूत्र संचालनाची धुरा प्रसिद्ध निवेदक प्रशांत जी महंकाळे यांनी सांभाळली.
वेणूनाद थिएटर्स प्रस्तुत ऑर्केस्ट्रा स्मॅश बिट्स यांच्या या उत्कृष्ट मेजवानी बद्दल रसिकांनी भरभरून शुभेच्छा दिल्या.