loader image

कपिलनाथ आश्रमाचे महंत देवदत्तनाथ रामनाथस्वामी (देवबाबा) अनंतात विलीन

Oct 21, 2022


नांदगाव सोमनाथ घोंगाणे

नांदगाव तालूक्यातील ढेकू येथील कपिलनाथ आश्रमचे मठाधिपती महंत देवदत्तनाथ रामनाथ स्वामी (देवबाबा) यांचे शुक्रवारी (दि.२१) वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाने नाथ संप्रदायाबरोबरच वारकरी संप्रदायातील एक दुवा निखळला आहे. मराठवाडा, खान्देशसह परिसरात त्यांचा मोठा शिष्यवर्ग आहे.
नांदगाव तालुक्यातील ढेकू येथील कपिलनाथ आश्रमाचे महंत तथा मठाधिपती देवदत्तनाथ रामनाथ स्वामी (वय ७३) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.दि.२१ रोजी भजनाच्या स्वरात अंत्ययात्रा काढण्यात आली. साधू संत व भक्त परिवाराच्या उपस्थितीत त्यांना विधिवत समाधीस्थ करण्यात आले.यावेळी असंख्य भक्त परिवार व जनसमुदाय त्यांच्या अंतिम दर्शनासाठी उपस्थित होता.
महंत देवदत्त रामनाथ स्वामी हे ‘देवबाबा’ नावाने परिचित असून त्यांचे मूळ नाव रामदास शेकू सूर्यवंशी होते. बालवयातच त्यांना नाथदीक्षा प्राप्त झाली होती.ग्रामीण भागात प्रबोधन,निर्गुण भजन सेवा त्यांनी केली.नाथसंप्रदायाचा ग्रामीण भागात प्रसार केला.नाथसंप्रदायाच्या विचारांचा वारसा जोपासून एक धर्मनिष्ठ व संस्कारशील समाज घडविण्यासाठी त्यांनी आजीवन कार्य केले.मराठवाडा, खान्देशसह परिसरात त्यांचा मोठा भक्त परिवार असून त्यांच्या निधनाने विविध स्तरांतून शोक व्यक्त केला जात आहे.विविध क्षेत्रातील व्यक्तींनी आपल्या भावना व्यक्त करतांना त्यांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला आहे.दि.५ नोव्हेंबर रोजी त्यांच्या षोडदशी विधिचे आयोजन कपिलनाथ आश्रम ढेकू येथे करण्यात येणार आहे.


अजून बातम्या वाचा..

अश्विन मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 10/020/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

अश्विन मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 10/020/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
.