मनमाड येथील कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे आज दिनांक २१ ऑक्टोबर २०२२ रोजी महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेचे जनरल सेक्रेटरी समाजश्री मा.डॉ. प्रशांत दादा हिरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे आणि कर्मचारी वर्गाचे शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहावे व त्यांच्या आरोग्य विषयक समस्या दूर करण्यासाठी या आरोग्य केंद्राची स्थापना करण्यात आली. मनमाड परिसरातील नामांकित डॉक्टरची सेवा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध राहावी यासाठी महाविद्यालयात निरामय आरोग्य केंद्र सुरू करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण पाटील यांनी आपल्या मनोगतातून महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेचे जनरल सेक्रेटरी समाजश्री डॉ. प्रशांतदादा हिरे यांच्या सामाजिक कार्याचा आढावा घेतला. महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेची उत्तरोत्तर प्रगती व्हावी यासाठी संस्थेचे जनरल सेक्रेटरी समाजश्री डॉ. प्रशांतदादा हिरे यांनी अत्यंत तळमळीने आणि विचारपूर्वक प्रयत्न करून आज संस्थेचा दैदिप्यमान विस्तार केला. निरपेक्ष भावनेने मा. दादासाहेबांनी केलेले हे कार्य आपल्या सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे. अशा आदरणीय नेतृत्वाचा, मा. दादासाहेबांचा वाढदिवसाचे औचित्य साधून आपल्या महाविद्यालयामध्ये एक कायमस्वरूपी आरोग्य केंद्र स्थापन केले जावे, असे विचार त्यांनी मांडले. याप्रसंगी मनमाड येथील मनमाड डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अजय भन्साळी, डॉ. सुनील बागरेचा, डॉ. प्रताप गुजराती, डॉ.प्रवीण शिंगी, डॉ. शांताराम कातकाडे, डॉ. निलेश राठी, डॉ. रवींद्र राजपूत, डॉ. सौ. पूनम राजपूत, डॉ. सौ. निधी भन्साळी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. याप्रसंगी सर्व डॉक्टर्सने आपले मनोगत व्यक्त केले. आपल्या मनोगतातून अशा प्रकारच्या स्तुत्य उपक्रमाचे सर्व डॉक्टर्सनी कौतुक केले व प्रत्येक महाविद्यालयात अशा निरामय आरोग्य केंद्राची आवश्यकता आहे. असे प्रतिपादन केले तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना, विद्यार्थ्यांनी स्वतःची काळजी घेणे गरजेचे आहे, आपला आहार समतोल ठेवावा,जंक फूड टाळावे व आपल्या आरोग्यविषयक समस्या डॉक्टरांसमोर निर्भीडपणाने मांडावे इत्यादी विचार त्यांनी व्यक्त केले. डॉ प्रताप गुजराती यांच्याकडून या निरामय आरोग्य केंद्रासाठी प्राथमिक प्रथमोपचार बॉक्स, स्टेटसस्कोप, डिजिटल बीपी ऑपरेटर्स इ. देण्यात आले. कार्यक्रमाची सूत्रसंचालन प्रा गणेश गांगुर्डे यांनी केले वरिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. प्रमोद आंबेकर यांनी आभार व्यक्त केले. याप्रसंगी कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्य सौ ज्योती पालवे, महाविद्यालयाचे कुलसचिव श्री समाधान केदारे, महाविद्यालयातील पर्यवेक्षक, प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे संयोजन राष्ट्रीय सेवा योजना विभागाकडून करण्यात आले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ.जे. डी. वसईत, डॉ.जे. वाय.इंगळे, डॉ. पवनसिंग परदेशी,डॉ. पी. जे. आंबेकर, डॉ.कविता काखंडकी यांनी विशेष परिश्रम घेतले.