loader image

मनमाड वर्कशॉपमध्ये सम्राट बळी राजा प्रतिमा पूजन

Oct 23, 2022


मनमाड वर्कशॉप मध्ये सर्व कामगार संघटना मिळून बलीप्रतिपदानिमित्त सम्राट बळीराजाचे स्मरण व गौरव करण्यात आला.
बलीप्रतिपदादिन म्हणजे सम्राट बळीराजाचे स्मरण व गौरव करण्याचा दिवस होय.सम्राट बळीराजा हा बहुजन समाजाचा श्रेष्ठ पुर्वज होता.प्रत्येक श्रम करण्यार्या प्रत्येक माणसाला बळीराज्यात प्रतिष्ठा होती.
मनमाड वर्कशॉप मध्ये दरवर्षी बलिप्रतिपदा या दिवशी बळीराजाचे स्मरण व गौरव करण्यात येते.
वर्कशॉप ला सलग सुट्टी आल्यामुळे शनिवार बळीराजाच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.
झोनल सचिव सतिश भाऊ केदारे व या महिन्यात सेवानिवृत्त होत असलेले कर्मचारी अरुण पाटील यांच्या हस्ते सम्राट बळी राजाच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून झोनल सचिव सतिश भाऊ केदारे, C.R.M.S.चे बलराज तगारे, कारखाना शाखा चे सहाय्यक सचिव सोमनाथ सणस,N.R.M.U.चे कारखाना शाखा चे सचिव रमेश केदारे, अध्यक्ष किरण कातकडे, असोसिएशन चे झोनल कार्यकारिणी सदस्य प्रविण अहिरे, ज्युनिअर इन्स्टिट्यूट ऑफ मनमाड चे सचिव संदीप धिवर, राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन रेल्वे कार्मचारी संघाचे सुनिल भोसले, राजेंद्र अहिरे सिनियर सेक्सन इंजिनिअर उत्तम गांगुर्डे, सिनियर सेक्सन इंजिनिअर संतोष खरे, सिनियर सेक्सन इंजिनिअर सुरेश गरूड, सिनियर सेक्सन इंजिनिअर मुझम्मिल शेख, आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रविण बागुल यांनी केले.तर आभारप्रदर्शन अश्फाक खान यांनी केले.
यावेळी किरण कातकडे,सागर साळवे, चंद्रशेखर दखणे, नंदु कदम आदी चे भाषणे झाली.
कार्यक्रमाचे आयोजन गिरीश पाटील, सुनिल तगारे, अश्फाक खान, राजेंद्र अहिरे, अक्रम शेख, भिमराव सातदिवे, संजय अहिरे, गौतम गांगुर्डे, गणेश केदारे, विकास अहिरे, संदिप पगारे, नवनाथ जगताप,राजू नांगरे, मुकुंद उबाळे, अभ्युदय बागुल, विनोद खरे, प्रशांत मोरे, विजय काळे, मोरे मेजर, अर्जुन बागुल आदी ने केले.

 


अजून बातम्या वाचा..

अश्विन मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 10/020/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

अश्विन मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 10/020/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
.