loader image

रमेशशेठ दंडगव्हाळ : दिवाळीतच दिवा विझला !

Oct 25, 2022


परिस्थितीने सामान्य पण मनाने श्रीमंत नांदगावचे सख्खे शेजारी. रमेशशेठ दंडगव्हाळ यांनी कालचं लक्ष्मीपूजन आटोपून या जगाचा उजडण्यापूर्वीच नाशिक मुक्कामी निरोप घेतला. दिवाळीतच दिवा विझला.
रामेशशेठ हे ‘शेठ’ या उपाधीला वेगळ्याअर्थाने सार्थ होते. त्यांची मनोवृत्ती कुजकी नव्हती. सतत दुसऱ्याच्या भल्याचा विचार करीत असत. दुसऱ्याने वाईट केले तरी ते त्यावर अवाक्षरही बोलत नसे. जो दुसऱ्याचे वाईट करील त्याचे आपोआप वाईट होईल, ही त्यांची धारणा होती. त्यांच्या जगण्याची एक स्वतंत्र फिलॉसॉफी होती. मनाचे पदर ते कोणाजवळही उघड करत नसे. दुःख कसे गिळावे हे त्या माणसाकडून शिकण्यासारखे होते. तेच आता सणासुदीला कुटुंबाला तसेच मित्र परिवाराला दु:खाच्या खाईत लोटून गेले, आता सावरायचे कसे असा प्रश्न आहे. नांदगावला त्यांचेवर अनेक संकटे कोसळली परंतु त्यांनी हिंमत कधी हारली नाही.त्यानंतर मुलं नाशिकला व्यवसायाच्या निमित्ताने स्थिरावली. त्यांच्यासाठी त्यांनी नाईलाजाने नांदगाव सोडले. मन मात्र सारखं नांदगावचाच विचार करीत असे. नांदगावचे कुणी भेटले की त्यांना मनापासून आनंद वाटायचा. त्यांच्या या आनंदासाठी मी त्यांना आवर्जून भेटायचो. परवा त्यांच्या भेटीसाठी गेलो असता भेट झाली नाही. अचानक असे कुणालाही न सांगता ते अनंताच्या प्रवासाला निघून गेले.
दंडगव्हाळ परिवारास वेगळी प्रतिष्ठा आहे. त्यांचे मोठे बंधू सुरेश उर्फ खंडू दंडगव्हाळ हे सामाजिक कार्यात अग्रेसर असतात. त्यांचे धाकटे बंधू शंभूराजे त्यांच्यासोबत नाशिकला आले. चिरंजीव महेश याचे नाशिकच्या प्रधान पार्कमध्ये मोबाईलचे दुकान आहे. पुतण्या गौरव त्याला मदत करतो. तसे आता ह्या कुटुंबाचे छान चालले होते. त्यात रामेशशेठ यांच्या अचानक जाण्याने सर्व घडी विस्कळीत झाली आहे. रमेशशेठ यांची पोकळी सर्वांनाच जाणवेल. या दुःखातून सावरण्याची शक्ती निर्मिक त्यांच्या कुटूंबास प्रदान करो, भावपूर्ण श्रद्धांजली !
– भास्कर कदम, नांदगाव.


अजून बातम्या वाचा..

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

  मनमाड - शहरात गेली 29 वर्ष कार्यरत असलेली व मनमाड शहराची अर्थ वाहिनी असलेल्या प्रगती अर्बन...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

मनमाड - BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

मनमाड- महाराष्ट्र बास्केटबॉल असोसिएशन यांच्या मान्यतेने तसेच नाशिक डिस्ट्रिक्ट बास्केटबॉल असोसिएशन...

read more
.