Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

कमलाक्षाय गणेश मंदिरात दिवाळी पाडवा निमित्ताने दिपोत्सव साजरा

Oct 26, 2022

मनमाड : दिवाळीला लक्ष्मीपूजनानंतर दुसरा महत्त्वाचा आणि वर्षभरातील साडेतीन मुहुर्तांपैकी एक असलेला सण म्हणजे दिवाळी पाडवा. अश्विन महिन्यातील अमावास्येला लक्ष्मीपूजन झाल्यानंतर कार्तिक शुद्ध प्रतिपदेला बलिप्रतिपदा हा दिवस दिवाळी पाडवा म्हणून साजरा केला जातो.

या दिवशी सुवासिनींकडून पतीला औक्षण, व्यापाऱ्यांसाठी वर्षाचा प्रारंभ अशा अनेक बाजूंनी या दिवसाचे महत्त्व अधोरेखित केले जाते. पाडव्याला पंचरंगी रांगोळीने बळीची प्रतिमा काढून तिचे पूजन करतात. ‘इडा, पीडा टळो आणि बळीचे राज्य येवो’, अशी प्रार्थना या दिवशी केली जाते. फटाक्यांची आतषबाजी, तसेच दिपोत्सवही या दिवशी केला जातो. या दिवसाचे वैशिष्ट्य म्हणजे साडेतीन मुहूर्तांपैकी एक असा हा दिवस अतिशय शुभ मानला जातो.याच दिवसाचे ओचीत्य साधुन मनमाड येथील आय. यु. डी. पी. परिसरात असणाऱ्या कमलाक्षाय गणेश मंदिरामध्ये पाडवा पहाटेला दिपोत्सव साजरा करण्यात आला.पहाटे गणेशाची पुजा करून भजन म्हणुन , सुंदर अशी रांगोळी काढुन , सुवसनिणींकडुन श्रीगणेशाची आरती करून दिपोत्सव साजरा करण्यात आला. याप्रसंगी परिसरातील महिला भाविक उपस्थित होत्या.

अजून बातम्या वाचा..

🛑 फलक रेखाटन

🛑 फलक रेखाटन

देशसेवा व्रत हाती स्वीकारून ,देश,गाव, गावातील घर, गावातील शाळा,गावातील शेती,माती,व मातीत राबणाऱ्या...

read more
नांदगाव शहरातील मुस्लीम बहूल गुलझारवाडी येथे महिलांसाठी कोचींग क्लासेस  प्रशिक्षण संपन्न

नांदगाव शहरातील मुस्लीम बहूल गुलझारवाडी येथे महिलांसाठी कोचींग क्लासेस प्रशिक्षण संपन्न

नांदगाव सोमनाथ घोंगाणे नांदगाव शहरातील माजी नगरसेवक दिवंगत इकबाल दादा शेख कोचिंग क्लासेस मार्फत...

read more
विद्यार्थ्यांना बस उपलब्ध करून देण्यासाठी युवासेना भालुर तर्फे नांदगाव बस डेपो ला निवेदन

विद्यार्थ्यांना बस उपलब्ध करून देण्यासाठी युवासेना भालुर तर्फे नांदगाव बस डेपो ला निवेदन

दिनांक १४/०९/२०२२ बुधवार रोजी नांदगाव ते भालुर मार्गावरील विद्यार्थ्यांसाठी बस सेवा सुरू करणे व...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]