नांदगाव (सोमनाथ घोंगाणे)
आम आदमी पार्टी नाशिक ग्रामीण जिल्हा कार्यकर्ता मेळावा नांदगाव येथे पार पडला. येथील गुप्ता मंगल कार्यालयात पार पडलेल्या मेळाव्यासाठी आम आदमी पार्टीचे राज्य अध्यक्ष रंगा राचुरे तर राज्य सचिव धंनजय शिंदे,जिल्हाध्यक्ष ॲड प्रभाकर वायचळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
तसेच या वेळी व्यासपीठावर जिल्हा उपाध्यक्ष विशाल वडघुले, उत्तम निरभवने , विकी कदम, विकास गवळी, निवृत्ती खालकर, आनिल कौशिक, आमोल लांडगे, आल्ताफ शेख, शैलेंद्र सिन्हा,सुरेश देवकर, प्रमोद पगारे, विशाल धोडगे,अरुन धिवर यांच्या सह मान्यवर उपस्थित होते.
या मेळाव्याची सुरवात महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. मेळाव्या दरम्यान मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त करत आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकी करीता आम आदमी पार्टी स्वबळावर चांगल्या ताकदीने लढविणार असल्याचा निर्धार केला. तसेच राज्यध्यक्ष यांच्या उपस्थितीत काही कार्यकर्तांनी आम आदमी पक्षात प्रवेश केला.
या वेळी आम आदमी पक्ष्याचे कार्यकर्ते पदाधिकारी सह नागरीक मोठ्या संख्येत उपस्थित होते.
कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.
मनमाड साहित्य संघाच्या काव्य स्पर्धा उत्साहात संपन्न
मनमाड साहित्य संघा ने आयोजित केलेल्या शालेय विद्यार्थ्यांसाठींची काव्यस्पर्धा मराठी भाषा गौरव दिनी...











