Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

कमलाक्षाय गणेश मंदिरात दिवाळी पाडवा निमित्ताने दिपोत्सव साजरा

Oct 26, 2022

मनमाड : दिवाळीला लक्ष्मीपूजनानंतर दुसरा महत्त्वाचा आणि वर्षभरातील साडेतीन मुहुर्तांपैकी एक असलेला सण म्हणजे दिवाळी पाडवा. अश्विन महिन्यातील अमावास्येला लक्ष्मीपूजन झाल्यानंतर कार्तिक शुद्ध प्रतिपदेला बलिप्रतिपदा हा दिवस दिवाळी पाडवा म्हणून साजरा केला जातो.

या दिवशी सुवासिनींकडून पतीला औक्षण, व्यापाऱ्यांसाठी वर्षाचा प्रारंभ अशा अनेक बाजूंनी या दिवसाचे महत्त्व अधोरेखित केले जाते. पाडव्याला पंचरंगी रांगोळीने बळीची प्रतिमा काढून तिचे पूजन करतात. ‘इडा, पीडा टळो आणि बळीचे राज्य येवो’, अशी प्रार्थना या दिवशी केली जाते. फटाक्यांची आतषबाजी, तसेच दिपोत्सवही या दिवशी केला जातो. या दिवसाचे वैशिष्ट्य म्हणजे साडेतीन मुहूर्तांपैकी एक असा हा दिवस अतिशय शुभ मानला जातो.याच दिवसाचे ओचीत्य साधुन मनमाड येथील आय. यु. डी. पी. परिसरात असणाऱ्या कमलाक्षाय गणेश मंदिरामध्ये पाडवा पहाटेला दिपोत्सव साजरा करण्यात आला.पहाटे गणेशाची पुजा करून भजन म्हणुन , सुंदर अशी रांगोळी काढुन , सुवसनिणींकडुन श्रीगणेशाची आरती करून दिपोत्सव साजरा करण्यात आला. याप्रसंगी परिसरातील महिला भाविक उपस्थित होत्या.

अजून बातम्या वाचा..

आमदार सुहास कांदे यांची वीज वितरण कंपनीच्या अधिकारी तथा कर्मचारी यांच्या सोबत एकत्रित बैठक संपन्न

सातत्याने ग्रामीण भागातील वीज वितरण कंपनीच्या कारभाराच्या वाढत्या तक्रारींची दखल घेत आमदार सुहास...

read more

शिवसेना संस्थापक हिंदू ह्रदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे जयंतीनिमित्त चांदवड रोड टपरीधारक सेना शाखेचे नुतनीकरण व भव्य पक्ष प्रवेश सोहळा

आज दि. 23 जानेवारी हिंदू ह्रदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे जयंतीनिमित्त चांदवड रोड टपरीधारक...

read more

मनमाड शहर शिवसेना शाखे तर्फे हिंदुहृद्यसम्राट सरसेनापती शिवसेनाप्रमुख मा. स्व.बाळासाहेब ठाकरे यांची जयंती जल्लोषात साजरी

शिवसेना आमदार मा श्री सुहास आण्णा कांदे यांच्या मार्गदर्शनाखालीयुवतीसेना नांदगाव तालुक्याच्या...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]