loader image

अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल येथे “ सुरक्षित मातृत्व ” कार्यशाळा संपन्न

Oct 27, 2022


नाशिक : अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल तर्फे “मातृत्व” कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत ४० दाम्पत्यांनी हजेरी लावली होती गरोदर माता आणि त्यांच्या जोडीदाराच्या मनातील शंका आणि प्रश्न विचारात घेऊन उत्तर महाराष्ट्रामध्ये प्रथमच मोठ्या स्तरावर गरोदर मातांसाठी ‘सुरक्षित मातृत्व’ हा मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेऊन या कार्यक्रमाला “मातृत्व” असे नाव देण्यात आले होते या कार्यशाळेत गरोदर स्त्रिया आणि त्यांच्या जोडीदारांनी तज्ज्ञांशी मुक्त संवाद साधला.
मेडिकल डायरेक्टर तथा नवजात शिशु व बालरोग तज्ञ् डॉ सुशील पारख हे कार्यक्रमाचे प्रास्तविक करतांना म्हणाले कि, गर्भधारणापूर्व समुपदेशन , प्रसूती पूर्व चाचणी, सुखरूप प्रसूती , पोषण व आहार , व्यायाम , नवजात शिशु चे संगोपन ,व प्रसूती पश्चात घेण्यात येणारी काळजी , या सर्व सुविधा जर एकाच ठिकाणी उपलब्ध झाल्यास माता व नवजात शिशु यांच्यावर योग्य उपचार करण्यास सोईचे जाते , याच प्रमाणे जर प्रसूती पूर्व चाचणी मध्ये गरोदर मातेस उच्च रक्तदाब किंवा इतर व्याधी असल्यास त्याचे योग्य निदान करून सुखरूप प्रसूती करता येते , मुदतीपूर्व प्रसूती झाल्यास नवजात शिशूला एनआयसीयू (NICU) ची गरज पडल्यास बाळाला दुसऱ्या रुग्णालयात दाखल करण्यासाठी जो महत्वाचा वेळ वाया जाऊन बाळाच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. जर या सर्व सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध झाल्यास माता आणि नवजात शिशु यांच्या आरोग्याचे संभाव्ये धोके टाळता येऊ शकतात.
या कार्यशाळेत स्रीरोग व प्रसूतीशास्र तज्ञ् डॉ मनोज पापरिकर , डॉ श्रीकला काकतकर , डॉ प्रणिता संघवी , डॉ कुणाल आहिरे , बालरोग तज्ञ् डॉ किरण मोटवाणी ,फिजोथेरीपिस्ट डॉ रोहन देव ,पोषण व आहार तज्ञ् साक्षी भाबांरे आणि गर्भसंस्कार प्रशिक्षिका डॉ वैदेही देवधर.यांनी प्रमुख विषयावर मोलाचे मार्गदर्शन केले. सुरक्षित मातृत्व या विशेष कार्यशाळेत सर्व सामान्य कुटुंब यांना डोळ्यासमोर ठेऊन उपस्थित जोडप्याच्या हस्ते मातृत्व पॅकेज चे उदघाटन करण्यात आले. आभार प्रदर्शन केंद्र प्रमुख समीर तुळजापूरकर यांनी केले..“मातृत्व” कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी हॉस्पिटल मधील सर्व विभाग यांचे मोलाचे सहकार्य लाभले.


अजून बातम्या वाचा..

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

  मनमाड - शहरात गेली 29 वर्ष कार्यरत असलेली व मनमाड शहराची अर्थ वाहिनी असलेल्या प्रगती अर्बन...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

मनमाड - BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

मनमाड- महाराष्ट्र बास्केटबॉल असोसिएशन यांच्या मान्यतेने तसेच नाशिक डिस्ट्रिक्ट बास्केटबॉल असोसिएशन...

read more
.