loader image

आंतरराष्ट्रीय खेळाडू आकांक्षा व्यवहारे ला राष्ट्रीय खेलो इंडिया महिला रँकिंग स्पर्धेत नवीन राष्ट्रीय विक्रमासह सुवर्णपदक

Oct 28, 2022


मोदीनगर येथे सुरू असलेल्या दुसऱ्या राष्ट्रीय खेलो इंडिया महिला रँकिंग स्पर्धेत आंतरराष्ट्रीय खेळाडू आकांक्षा व्यवहारे ला तीन नवीन राष्ट्रीय विक्रमासह सुवर्णपदक
आज सुरू झालेल्या महिला रँकिंग राष्ट्रीय खेलो इंडिया वेटलिफ्टिंग स्पर्धेत 40 किलो वजनी गटात आपल्या उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत स्नॅच मध्ये 60 किलो वजन उचलून स्वतःचाच 59 किलो चा विक्रम मोडीत काढत नवीन राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला तसेच क्लिन जर्क मध्ये 71 किलो वजन उचलून पुन्हा एकदा स्वतःचाच 70 किलोचा राष्ट्रीय विक्रम मोडीत काढत नवीन राष्ट्रीय विक्रमासह एकूण 131 किलो चा नवीन राष्ट्रीय विक्रम स्थापित करून तीन नवीन राष्ट्रीय विक्रमासह सुवर्णपदक व रोख दहा हजार रुपयांचे पारितोषिक पटकावून महाराष्ट्रासाठी विजयी सुरवात केली आहे पतियाळा भुवनेश्वर व आता मोदीनगर येथे नवीन राष्ट्रीय विक्रमासह सुवर्णपदक पटकावून हॅट्ट्रिक साजरी.

आकांक्षा ला छत्रे विद्यालयाचे क्रीडा प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे व आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तृप्ती पाराशर यांचे मार्गदर्शन लाभले आहे
जय भवानी व्यायामशाळेचे अध्यक्ष डॉ विजय पाटील,मोहन अण्णा गायकवाड,डॉ सुनील बागरेचा प्रा दत्ता शिंपी,छत्रे विद्यालयाचे आधारस्तंभ पी जी धारवाडकर, अध्यक्ष पी जे दिंडोरकर, सचिव दिनेश धारवाडकर, संचालक नाना कुलकर्णी प्रसाद पंचवाघ,मुख्याध्यापक आर एन थोरात, उपमुख्याध्यापक संदीप देशपांडे,पर्यवेक्षिका सौ पोतदार एस एस, गुरुगोविंद सिंग हायस्कुल चे अध्यक्ष बाबा रणजित सिंग जी व प्राचार्य सदाशिव सुतार महाराष्ट्र राज्य वेटलिफ्टिंग संघटनेचे अध्यक्ष संजय मिसर,सचिव प्रमोद चोळकर,भारतीय व महाराष्ट्र वेटलिफ्टिंग संघाचे उपाध्यक्ष संतोष सिंहासने यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.


अजून बातम्या वाचा..

नांदगाव तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सेंट झेवियर हायस्कूलच्या खेळाडूंचे घवघवीत यश

नांदगाव तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सेंट झेवियर हायस्कूलच्या खेळाडूंचे घवघवीत यश

मनमाड:-क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक, व...

read more
आयशा गाजियानी मॅडम यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल एच.ए. के. हायस्कूल ज्यु.कॉलेज तर्फे सत्कार.

आयशा गाजियानी मॅडम यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल एच.ए. के. हायस्कूल ज्यु.कॉलेज तर्फे सत्कार.

  मनमाड :- रोटरी क्लब ऑफ मनमाड तर्फे एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड च्या...

read more
.