loader image
[ays_poll id=7]

राशी भविष्य : २९ ऑक्टोबर २०२२ – शनिवार

Oct 29, 2022


मेष: आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. आज उक्ती व कृती ह्यावर संयम ठेवणे तसेच राग द्वेषापासून दूर राहणे हितावह राहील. गुप्तशत्रूंचा त्रास संभवतो. रहस्यमय व गूढ विषयांचे आकर्षण राहील. शक्यतो प्रवास टाळा.

वृषभ – आज आपले कौटुंबिक जीवन सुखाचे व आनंदाचे असल्याचे आपणास जाणवेल. कुटुंबीय व स्नेहीजनांसह प्रसन्न वातावरणात भोजनाचा आनंद घेऊ शकाल. त्याच बरोबर छोटया प्रवासाचे बेत आखाल.

मिथुन – आजचा दिवस शुभ फलदायी आहे. घरात शांती व आनंदाचे वातावरण राहील. अपूर्ण कामे तडीस गेल्याने आपणांस यश व कीर्ती लाभेल. आर्थिक लाभ होतील. खर्चाचे प्रमाण मात्र वाढेल. पण केलेला खर्च वाया जाणार नाही.

कर्क – आजचा दिवस अगदी शांत राहून घालवावा लागेल. शारीरिक व मानसिक अस्वास्थ्यामुळे बेचैन राहाल. अचानक खर्च उदभवतील. प्रणयी जीवनात वाद होऊन मतभेद होतील. भिन्नलिंगी व्यक्तींकडे आकर्षित झाल्याने एखाद्या संकटात सापडाल. आज यात्रा, प्रवास किंवा नवीन कामाची सुरुवात करणे हितावह होऊ शकणार नाही.

सिंह – आज कुटुंबातील वातावरण वाद – विवादाचे राहील. कुटुंबियांशी मतभेद होतील. आईची तब्बेत बिघडू शकते. मनात नकारात्मक विचार येऊन उदासीनता जाणवेल. आजचा दिवस जमीन, घर, वाहन इत्यादी व्यवहार करताना हस्ताक्षर करण्यास अनुकूल नाही. नोकरदारांना पण दिवस अनुकूल नाही.

कन्या – आज शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. प्रेमपूर्ण संबंधांमुळे अगदी भारावून जाल. भावंडांसह वेळ आनंदात जाईल. त्यांच्या कडून लाभ पण होतील. प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल. नशिबाची साथ मिळेल.

तूळ – आज आपली द्विधा मनःस्थिती राहिल्याने कोणतेही महत्वाचे निर्णय घेऊ नये. तसेच नवीन काम सुरू करू नका. वाणीवर संयम ठेवल्यास कुटुंबीयांशी वाद होणार नाहीत. जिद्द सोडून समाधानाने राहावे लागेल.

वृश्चिक – आज कुटुंबियांसह आनंदात दिवस घालवाल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. प्रिय व्यक्तीचा सहवास आनंददायी ठरेल. एखादी चांगली बातमी मिळेल. स्नेही व मित्रवर्ग यांच्या कडून भेटवस्तू मिळाल्याने आनंद होईल.

धनु – आजचा दिवस कष्टदायी आहे. कुटुंबियांशी मतभेदाचे प्रसंग उदभवतील. स्वभावात रागीटपणा येऊन वाद होतील. आरोग्यास त्रास संभवतो. वर्तन व बोलणे संयमित ठेवावे लागेल. एखादा अपघात संभवतो. खर्चात वाढ होईल.

मकर – मित्र व स्नेहीजनांचा सहवास घडल्याने आजचा दिवस आनंदात जाईल. सामाजिक क्षेत्र, व्यापार व इतर क्षेत्रातही आजचा दिवस आपणाला लाभदायी आहे. विवाहेच्छुकांना जोडीदाराची निवड सहजपणे करता येईल. प्रवास किंवा सहलीची शक्यता आहे.
कुंभ – आजचा दिवस अनुकूलतेचा आहे. आज आपले प्रत्येक काम सहजपणे पार पडेल. त्यामुळे आनंदी राहाल. नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी अनुकूल वातावरण राहील. त्यामुळे मोठे यश मिळू शकेल. वरिष्ठ व वडीलधार्‍यांचे आशीर्वाद मिळाल्याने मनावरील ताण कमी होईल.

मीन – मनातील दुःख व अशांतता ह्याने आजच्या दिवसाची सुरुवात होईल. शारीरिक थकवा जाणवेल. वरिष्ठांशी वाद संभवतात. संतती विषयी काळजी सतावेल. निरर्थक खर्च होईल. प्रतिस्पर्ध्यांशी वाद टाळा. पोटाची तक्रार राहील. नशिबाची साथ लाभणार नाही.


अजून बातम्या वाचा..

.