loader image
[ays_poll id=7]

बघा व्हिडिओ – आय यू डी पी परिसरातील तरुणांचा स्तुत्य उपक्रम

Oct 29, 2022


आय.यु.डि.पी. दर्शन फ्रेंड सर्कल मधील तरुणांनी उत्स्फूर्तपणे एक स्तुत्य ऊपक्रम राबविला. परिसरातील स्वच्छता करून अनेक स्वच्छतेचे, पर्यावरणाचे जनजागृतीपर संदेश देणारे फोमशीट बोर्ड तयार करून प्रत्येक घरांचे गेटवर लावण्यात आले. त्या बोर्डवर एक पाऊल स्वच्छतेकडे, कचरा घंटागाडीतच टाका, स्वच्छ शहर आनंदी शहर, पुढील पिढीसाठी चांगली देन, माझा परिसर स्वच्छ ठेवेन, स्वच्छ सुंदर परिसर आरोग्य नांदेल निरंतर, कचरा योग्य ठिकाणी ठेवा, पृथ्वी, पाणी, हवा ठेवा साफ नाहीतर पुढली पिढी नाही करणार माफ, असा संदेश देण्यात आला. प्रत्येक घराजवळ एक कुंडीमध्ये झाड लाऊन ते कुंडीतील झाडाची जोपासायला परिसरातील नागरिकांना दत्तक म्हणून देण्यात आले. या ऊपक्रमाचे कौतुक परिसरातील श्री. महाले परिवार, शिंपी परिवार, चव्हाण परिवार, साखरे परिवार व महाराष्ट्र नवनिर्माण सेना शहराध्यक्ष सचिन शिरुड या नागरिकांनी केले असून दर्शन फ्रेंड सर्कलच्या तरुणांना शुभेच्छा दिल्या आहेत. दर्शन फ्रेंड सर्कलचे सार्थक महाले, विशाल शिंपी, आकाश घुगे, अनिकेत चव्हाण, अक्षय सोनार, विकी आहिरे, मोहित घुगे, विपीन महाले, विनीत महाले, सिद्धेश महाले, दानिश कुरेशी या युवकांनी हा स्तुत्य ऊपक्रम राबविला.

 


अजून बातम्या वाचा..

हिसवळ् बु॥ येथील विद्यालयात येणाऱ्या विद्यार्थी / विद्यार्थीनी साठी स्वंतंत्र बससेवा सुरू करा .

हिसवळ् बु॥ येथील विद्यालयात येणाऱ्या विद्यार्थी / विद्यार्थीनी साठी स्वंतंत्र बससेवा सुरू करा .

नांदगाव नांदगाव तालुक्यातील हिसवळ बु. येथे येणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र बस सेवा सुरू...

read more
वीज वितरण कर्मचाऱ्यांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर मनमाड नगर पालिकेचे नागरिकांना आवाहन

वीज वितरण कर्मचाऱ्यांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर मनमाड नगर पालिकेचे नागरिकांना आवाहन

मनमाड शहरातील तमाम नागरीकांना कळविण्यांत येते की, मनमाड शहरास पाणी पुरवठा करणारे वागदर्डी धरणात...

read more
नांदगाव तहसील कार्यालयात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

नांदगाव तहसील कार्यालयात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

भारतातील पहिल्या महिला शिक्षिका, मुख्याध्यापिका स्त्री शिक्षणाच्या प्रणेता विद्येची जननी व समस्त...

read more
एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी

मनमाड:- एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज मध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात...

read more
.