loader image

कवयित्री विनया काकडे यांच्या कवितासंग्रहाचा प्रकाशन सोहळा मान्यवरांच्या हस्ते संपन्न

Oct 30, 2022


मनमाड : (योगेश म्हस्के) मध्यमवर्गीय व एकत्र कुटुंबाशी समरस झालेल्या कवयित्री विनया काकडे यांच्या कवितांमधून स्त्री जीवनाच्या विविध पैलूंचे दर्शन घडते, तसेच त्यांच्या कवितासंग्रहातून स्त्रियांचे भावविश्व समर्थपणे वाचकांसमोर प्रकटते असे प्रतिपादन साहित्यिक ,पत्रकार डॉ विनोद गोरवाडकर यांनी केले.

आज शनिवारी कवयित्री विनया विकास काकडे यांच्या ‘माझिया मना’ या सिद्धी प्रकाशन प्रकाशित पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते अध्यक्षपदावरून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर वक्त्या डॉ प्रा.धनश्री साने , प्रकाशक साहित्यिक संदीप देशपांडे , कवयित्री विनया काकडे आदी उपस्थित होते , यावेळी डॉ गोरवाडकर यांनी ग्रामीण भागातुन साहित्य निर्मिती होणे ही विशेष बाब असल्याचे सांगत पुस्तकाचे कौतुक केले. सुनीताताई देशपांडे, डॉ सुधा मुर्ती
यांनी जपलेल्या सामाजिक जाणिवेचे दाखले देत त्यांनी काकडे परिवाराच्या सामाजिक बांधिलकीचा गौरव केला.

प्रमुख वक्त्या डॉ धनश्री साने यांनी ‘माझिया मना’ काव्यसंग्रहातुन विनया काकडे यांनी विविध विषयांना स्पर्श केल्याचे सांगत कवितांबद्दल गौरव उदगार काढले , त्यांचा कथासंग्रह लवकरच यावा अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली .प्रकाशक संदीप देशपांडे यांनी पुस्तक निर्मितीचा प्रवास उलगडला. आनंद काकडे यांनी प्रास्तविक केले. पाहुण्यांसह अनिल काकडे, विकास काकडे यांच्या हस्ते पुस्तक प्रकाशन झाले. कवयित्री विनया काकडे यांनी मनोगतातून काव्य लेखनाचा प्रवास मांडला.

अभिनेते शिवाजी शिंदे, रुपाली कुलकर्णी यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. मेघा काकडे यांनी काव्यसंग्रहातील कवितांचे वाचन केले. पत्रकार स्वाती गुजराथी यांनी भाषणातून काकडे परिवाराच्या कार्याचा आढावा घेतला. कवी जनार्दन देवरे यांनी सूत्रसंचालन केले तसेच कवी प्रदीप गुजराथी यांनी आभार मानले. संजय काकडे,श्रीपाद देव, मयुरी काकडे, मेघा काकडे यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. काकडे परिवाराने संयोजन केले.


अजून बातम्या वाचा..

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

  मनमाड - शहरात गेली 29 वर्ष कार्यरत असलेली व मनमाड शहराची अर्थ वाहिनी असलेल्या प्रगती अर्बन...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

मनमाड - BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

मनमाड- महाराष्ट्र बास्केटबॉल असोसिएशन यांच्या मान्यतेने तसेच नाशिक डिस्ट्रिक्ट बास्केटबॉल असोसिएशन...

read more
.