loader image
[ays_poll id=7]

राशी भविष्य : १ नोव्हेंबर २०२२ – मंगळवार

Nov 1, 2022


मेष – आपल्या राशी पासून चंद्र भाग्यात स्थानी आहे. आज नकारात्मक विचार, व्यवहार व नियोजना पासून दूर राहावे लागेल. अन्यथा आळस व दुःखात वाढ होईल. प्रकृती नरम गरमच राहील. आणखी वाचा

वृषभ – आज आपल्या हातून एखादे सरकार विरोधी कार्य होण्याची शक्यता असल्याने सावध राहावे लागेल. नवीन कार्यात अडचणी येतील.

मिथुन – आजचा दिवस सौख्यदायी आहे. मात्र, आपण दिवसभर आपली दैनंदिन कामेच करत राहाल. मन प्रसन्न राहण्यासाठी आपण मनोरंजनाचा आधार घ्याल. या आनंदात मित्र व संबंधितांना सहभागी करून घ्याल.

कर्क – आपल्या राशी पासून चंद्र सहावा स्थानी आहे. आज खूप मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांना दिवस लाभदायी आहे. नोकरीतील उत्तम कामगिरीमुळे बढती मिळण्याची शक्यता निर्माण होईल.

सिंह – आपल्या राशी पासून चंद्र पाचवा स्थानी आहे. साहित्य व कला ह्यातील गोडी वाढेल. पोटाच्या तक्रारींमुळे अस्वस्थता जाणवेल. दुपार नंतर आर्थिक अडचण दूर होईल.

कन्या – आपल्या राशी पासून चंद्र चवथा स्थानी आहे. आज शारीरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. मातेची प्रकृती बिघडेल. स्वकीयांवर संकट ओढवेल.

तूळ – आपल्या राशी पासून चंद्र तिसरा स्थानी आहे. आजचा दिवस नवीन कार्याचा आरंभ करण्यास अनुकूल आहे. गूढ विद्यांचे आकर्षण निर्माण होईल.

वृश्चिक – आज आपल्या एखाद्या वक्तव्यामुळे कुटुंबीयांची मने दुखावण्याची शक्यता आहे. कामात अपेक्षित यश प्राप्त होणार नाही. मनाची अवस्था द्विधा होईल. कामाचा व्याप वाढेल.

धनु – आज आपणाला आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. एखाद्या मंगल कार्यात सहभागी व्हाल. प्रवास संभवतो. वैवाहिक जीवनात सुख व आनंद मिळेल. दुपार नंतर कुटुंबात काही कारणास्तव वाद होतील.

मकर – आज कोणाला जामीन राहू नये, अन्यथा अडचणीत सापडाल. शारीरिक व मानसिक आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल. आपल्या बोलण्या वागण्यात संयमित राहावे लागेल. अपघाताची शक्यता असल्याने वाहन जपून चालवावे लागेल.

कुंभ – आपल्या राशी पासून चंद्र लाभात स्थानी आहे. आजचा दिवस लाभदायी आहे. आर्थिक व सामाजिक क्षेत्रांत प्रगती होईल. नवीन परिचय होतील. परंतु दुपार नंतर प्रकृती बिघडेल. कौटुंबिक वातावरण गढूळ होईल.

मीन – आपल्या राशी पासून चंद्र दशमात स्थानी आहे. आज द्विधा मनःस्थितीमुळे आपले विचार ठाम राहू शकणार नाहीत. नोकरीत वरिष्ठांकडून लाभ होतील. पदोन्नती संभवते. व्यापार विषयक नियोजन यशस्वीपणे करू शकाल.


अजून बातम्या वाचा..

.