loader image

मनमाड च्या खेळाडूंची खेलो इंडिया स्पर्धेत चमकदार कामगिरी

Nov 1, 2022


मोदीनगर उत्तरप्रदेश येथे 27 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर 2022 दरम्यान संपन्न होत असलेल्या दुसऱ्या खेलो इंडिया राष्ट्रीय महिला रँकिंग वेटलिफ्टिंग स्पर्धेत जय भवानी व्यायामशाळेच्या आठ खेळाडूंनी सहभागी होत चमकदार कामगिरी बजावली आहे.
आकांक्षा किशोर व्यवहारे हिने 40 किलो युथ वजनी गटात तीन नवीन राष्ट्रीय विक्रम स्थापित करीत सुवर्णपदक व रोख दहा हजार रुपयांचे पारितोषिक प्राप्त केले, 55 किलो वजनी गटात नूतन बाबासाहेब दराडे हिने पहिल्याच राष्ट्रीय वरीष्ठ गटाच्या स्पर्धेत उत्तम कामगिरी बजावली,59 किलो वजनी गटात ज्युनिअर मध्ये वैष्णवी वाल्मिक इप्पर हिने आपल्या पहिल्याच राष्ट्रीय स्पर्धेत सहावा क्रमांक व रोख तीन हजार रुपये, 64 किलो वजनी गटात ज्युनिअर मध्ये वैष्णवी जनार्धन उगले हिने आपल्या पहिल्याच राष्ट्रीय स्पर्धेत चांगली कामगिरी केली,71 किलो वरीष्ठ गटाच्या स्पर्धेत निकिता वाल्मिक काळे हिने चांगली कामगिरी केली 71 किलो युथ व ज्युनिअर मध्ये संध्या भास्कर सरोदे हिने चवथा क्रमांक पाच हजार रुपये व ज्युनिअर मध्ये सहावा क्रमांक तीन हजार रुपये,76 किलो ज्युनिअर मध्ये धनश्री विनोद बेदाडे हिने पाचवा क्रमांक पाच हजार रुपये,76 किलो युथ मध्ये करिष्मा रफिक शाह हिने चवथा क्रमांक पटकावत पाच हजार रुपये बक्षिसे पटकाविले. यशस्वी खेळाडूंना प्रशिक्षक श्री. प्रवीण व्यवहारे सर व आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तृप्ती पाराशर यांचे मार्गदर्शन लाभले.

मनमाड ठिणगी न्यूज पोर्टल तर्फे सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन.


अजून बातम्या वाचा..

अश्विन मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 10/020/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

अश्विन मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 10/020/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
.