loader image
[ays_poll id=7]

राशी भविष्य : ३ नोव्हेंबर २०२२ – गुरुवार

Nov 3, 2022


मेष – आपल्या राशी पासून चंद्र दशमात स्थानी आहे. आजचा दिवस आपणास लाभदायी आहे. व्यापार – व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता आहे. उत्पन्न वाढेल. दिवसभर आनंदी व खेळीमेळीचे वातावरण राहील.

वृषभ – आपल्या राशी पासून चंद्र भाग्यात स्थानी आहे. आज आपण व्यापार वृद्धीवर आपले लक्ष केंद्रित कराल. नवीन योजना व प्रणालीच्या वापराने व्यापार प्रगतीच्या दिशेने वाढत जाईल. मात्र कामात यश मिळण्यास विलंब होईल.

मिथुन – आपल्या राशी पासून चंद्र अष्टमात स्थानी आहे. आज मनात नकारात्मक विचार येतील, जे दूर करावे लागतील. अपघात होण्याची शक्यता असल्याने वाहन सावधपणे चालवावे. अचानकपणे खर्च वाढतील.

कर्क – आज आपणास स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद, सुंदर वस्त्रालंकारांचा लाभ व भिन्नलिंगी व्यक्तींचा सहवास लाभल्याने आपण आनंदित व्हाल. आपली आर्थिक बाजू मजबूत होईल. मन मात्र भरकटत राहील. अकस्मात पैसा खर्च होईल.

सिंह – आपल्या राशी पासून चंद्र सहावा स्थानी आहे. आजचा दिवस व्यापार वृद्धी करण्यास अनुकूल आहे. व्यवसायातील आर्थिक नियोजन यशस्वीपणे करू शकाल. योग्य कारणांसाठी पैसा खर्च होईल. परदेशस्थ व्यावसायीकांमुळे लाभ संभवतात.

कन्या – आपल्या राशी पासून चंद्र पाचवा स्थानी आहे. आजचा दिवस सौख्यदायी आहे. अलंकार खरेदी करू शकाल. कलेत आवड निर्माण होईल. व्यापारासाठी दिवस उत्तम आहे. आर्थिक बाबी मार्गी लागतील. घरात आनंद व शांतता लाभेल.

तूळ – आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. स्थावर संपत्ती विषयक व्यवहार करताना सावधगिरी बाळगा. आईच्या तब्बेतीची काळजी राहील. कुटुंबात वाद संभवतात.

वृश्चिक – आजचा दिवस व्यावसायिकांना अनुकूल आहे. वैवाहिक जीवनात निर्माण झालेल्या समस्यांचे निराकरण होईल. स्थावर संपत्ती संबंधित कामाचे सुद्धा निराकरण होऊ शकेल. भावंडांशी जवळीक साधू शकाल.

धनु – आपल्या राशी पासून चंद्र दुसरा स्थानी आहे. आज संभाव्य मतभेद टाळण्यासाठी उक्ती व कृतीवर नियंत्रण ठेवावे लागेल. दिवसभर मनात गूढ व रहस्यमय विषयांचे विचार येतील. विद्यार्थ्यांना लेखन- वाचनात एकाग्रता ठेवावी लागेल.

मकर – आज व्यवसायात अनुकूल वातावरण राहील. आज प्रत्येक कार्य विना विघ्न पार पडेल. दांपत्य जीवनातील वातावरणात कटुता निर्माण होईल. गूढ विषयांत गोडी निर्माण होईल. कार्यालयात आपला प्रभाव पडेल. दुपार नंतर मनावर नकारात्मक विचारांचा प्रभाव राहील.

कुंभ – आज आपल्यातील धार्मिक भावना उफाळून येईल. आज एखाद्या धार्मिक कार्यासाठी खर्च कराल. कोर्ट- कचेरीच्या कामात यश मिळेल. पुण्यकार्यासाठी पैसा खर्च होईल. मनःशांतीसाठी केलेल्या प्रयत्नांत यशप्राप्ती होईल.

मीन – आपल्या राशी पासून चंद्र लाभात स्थानी आहे. आज शेअर- सट्टा ह्यातून काही आर्थिक लाभ होईल. विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळेल. व्यवसायात लाभ होईल. कुटुंबात सुख- शांती लाभेल. रमणीय ठिकाणी प्रवासाला जाल. मित्रां कडून लाभ होईल.


अजून बातम्या वाचा..

.