loader image

बघा व्हिडिओ – पाकिस्तान चे माजी पंतप्रधान इम्रान खान गोळीबारात जखमी तर एक सहकारी मृत्यमुखी

Nov 3, 2022


पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या गुजरानवाला या ठिकाणच्या रॅलीमध्ये गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. या गोळीबारात इम्रान खान यांच्या पायाला जखम झाल्याची माहिती आहे. यानंतर इम्रान खान यांना तातडीने लाहोरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. इम्रान खान यांच्यासोबतच्या एकाचा मृत्यू झाला आहे तर सात जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. हल्लेखोरांपैकी एकाला ताब्यात घेण्यात आले आहे.

इम्रान खान यांच्यावर चार ते पाच हल्लेखोरांनी गोळीबार केल्याचे समोर आले असून त्यापैकी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. इम्रान खान यांच्यावर झालेल्या या गोळीबारानंतर केवळ पाकिस्तानच नव्हे तर जग हादरलं आहे. पाकिस्तान सध्या राजकीय आणि आर्थिक अस्थिरतेतून जात असून या देशात सध्या अनागोंदीच्या वातावरणातून जात आहे.

पाकिस्तानी सरकारच्या विरोधात इम्रान खान यांनी लाहोर ते इस्लामाबाद अशा ‘लॉंग मार्च’चे आयोजन केले आहे. लाँग मार्चच्या माध्यमातून इम्रान खान यांनी सरकारविरोधात मोर्चा खोलला असून देशातील निवडणुका लवकरात लवकर घेण्यात याव्यात अशी मागणी केली आहे. आज हा मोर्चा गुजरानवाला या ठिकाणी आला होता.

इम्रान खान यांच्यावर झालेल्या या गोळीबारानंतर आता पाकिस्तानमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. पाकिस्तानचे सरकार आणि आयएसआय या गुप्तचर संघटनेविरोधात इम्रान खान यांनी मोर्चा खोलल्यानंतर त्यांच्यावर हा हल्ला झाला आहे.


अजून बातम्या वाचा..

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

  मनमाड - शहरात गेली 29 वर्ष कार्यरत असलेली व मनमाड शहराची अर्थ वाहिनी असलेल्या प्रगती अर्बन...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

मनमाड - BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

मनमाड- महाराष्ट्र बास्केटबॉल असोसिएशन यांच्या मान्यतेने तसेच नाशिक डिस्ट्रिक्ट बास्केटबॉल असोसिएशन...

read more
.