मनमाड शहरातील मुख्य बाजारपेठेत एकेरी वापरल्या जाणारया प्लास्टिक वर बंदी असताना सर्रास विक्री करणाऱ्या विक्रेत्यावर मनमाड नगर परीषदेच्या पथकाने कारवाई करत सुमारे १८ किलो सिंगल युज प्लास्टिक जप्त करत विक्रेत्यास ८ हजार रुपयांचा दंड केला आहे.
शहरात असलेल्या मुख्य बाजारपेठेत सिंगल यूज प्लॅस्टिक सर्रास विक्री होत असल्याची माहिती मनमाड नगर परीषदेच्या पथकाला समजली होती. त्यानुसार पथकाने सदर दुकानावर कारवाई करत मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत सुमारे १८ किलो सिंगल युज प्लास्टिक जप्त करत करण्यात आले आहे. तर या विक्रेत्यास ८ हजार रुपयांचा दंडही करण्यात आला आहे.
शहरातील भाजी मार्केट, नेहरू रोड, सरदार पटेल रोड वरील होनसेन/किरकोळ दुकानांमध्ये तपासणी करून मे. शासनाने प्रतिबंधित केलेले १८ किलोग्रॅम सिंगल यूज प्लॅस्टीक जप्त केले. यामध्ये कॅरीबॅग्स, प्लास्टीकचे ग्लास, थर्माकोलच्या पत्रावळ्या, सिल्वर कोटेड पत्रावळ्या यांचा समावेश आहे. यासोबतच ८ हजार रुपयांचा दंड प्लास्टीक कॅरीबॅग विक्री करणाऱ्या दुकानदारांना ठोठावला.
या कारवाई प्रसंगी नगरपरिषदेचे कर अधिक्षक राजेंद्र पाटील, शरद बोडखे, स्वच्छता निरीक्षक विजय सोनवणे, वसुली विभागाचे उमेश सोनवणे, चंद्रकांत झाल्टे, पृथ्वीराज कोळगे, अशोक कटारे, कैलास पाटील, संजय जगताप, प्रमोद सांगळे, रमेश बोरसे, शेलेन्द्र अहिरे, अंबादास बनसोडे तसेच आरोग्य विभागाचे दिलीप थोरे, राजेंद्र धिगांन, सतिष चावरिया मटक चुनियान, संतोष वानखेडे कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतले होते.
शहरातील प्रत्येक नागरिकाने प्लास्टीकचा वापर टाळल्यास मनमाड शहर लवकरच प्लास्टीकमुक्त होईल असा विश्वास नगरपालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी डॉ.सचिनकुमार पटेल यांनी व्यक्त केला. तसेच सिंगल युज प्लास्टीकबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कडक पावले उचलली जातील असाही इशारा दिला आहे.