loader image

महावितरण कोकण प्रादेशिक आंतर परिमंडलीय नाट्य स्पर्धा मुख्य कार्यालयास विजेतेपद

Nov 5, 2022


मुंबई/नाशिक, दिनांक ५ नोव्हेंबर २०२२-
महावितरणच्या वतीने आयोजित केलेल्या कोकण प्रादेशिक आंतर परिमंडलीय नाट्य स्पर्धेत मुख्य कार्यालय, मुंबईच्या वतीने सादर करण्यात आलेल्या “सलवा जुडूम” हे नाटक विजेते ठरले.
वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात आयोजित नाट्य स्पर्धेत महावितरण कोकण प्रादेशिक विभागाचे सह व्यवस्थापकीय संचालक, चंद्रकांत डांगे यांच्या अध्यक्षतेखाली व महावितरणचे संचालक (संचलन), संजय ताकसांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत विजेत्या संघाला आणि नाट्य कलावंतांना बक्षिसे देण्यात आली. जळगाव परिमंडलाने सादर केलेल्या “आर्यमा उवाच” या नाटकास व्दितीय क्रमांक देण्यात आला.
कोरोना महामारीमुळे गेली दोन वर्षे ही नाटय स्पर्धा होऊ शकली नव्हती. दोन वर्षांच्या खंडानंतर सुरु झालेल्या या स्पर्धेला सर्वांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
“रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात विरंगुळा म्हणून महावितरण अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मनोरंजनासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली. याचा आनंद घेत सर्वांमध्ये एक नौऊर्जा निर्माण झाली आहे, असे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष व महावितरण कोकण प्रादेशिक कार्यालयाचे सह व्यवस्थापकीय संचालक चंद्रकांत डांगे यांनी केले.
“महावितरण कर्मचाऱ्यांनी सादर केलेली नाटके ही व्यवसायीक तोडीची होती, असे कौतुकास्पद शब्दात कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संचालक (संचलन) संजय ताकसांडे यांनी सर्व कलाकारांना प्रोत्साहित केले.
तीन दिवस चाललेल्या या नाट्य स्पर्धेत मुख्य कार्यालय, मुंबई, भांडूप नागरी परिमंडल, कल्याण परिमंडल, नाशिक परिमंडल, जळगाव परिमंडल, कोकण परिमंडल, रत्नागिरी यांनी आपआपली नाट्य कलाकृती सादर केली.
स्पर्धेतील विजेते (कंसात परिमंडळ नाव) – सर्वोत्तम नाटक निर्मिती: विजेते – सलवा जुडूम (सांघिक कार्यालय), उपविजेते – ‘आर्यमा उवाच’ (जळगाव),दिग्दर्शन:
प्रथम – जितेंद्र वेदक (सांघिक कार्यालय),
द्वितीय – मयुर भंगाळे (जळगाव), अभिनय पुरुष: प्रथम – संदीप वंजारी (भांडुप), व्दितीय- अमित दळवी (सांघिक कार्यालय); अभिनय महिला:
प्रथम – युगंधरा ओहोळ (जळगाव), व्दितीय – वृषाली पाटील, (कल्याण); रंगभूषा व वेशभूषा: प्रथम – आर्यमा उवाच (जळगाव), व्दितीय – सलवा जुडूम (सांघिक कार्यालय ); संगीत: प्रथम – सलावा जुडूम (सांघिक कार्यालय), व्दितीय – आर्यमा उवाच (जळगाव); प्रकाश योजना: प्रथम – सलवा जुडूम (सांघिक कार्यालय ), व्दितीय – आर्यमा उवाच (जळगाव); नेपथ्य: प्रथम – सलवा जुडूम (सांघिक कार्यालय), व्दितीय – आर्यमा उवाच (जळगाव). तसेच, उत्तेजनार्थ बक्षीस: किशोर साठे (सांघिक कार्यालय), शुभम सपकाळे (जळगाव), रुपाली पाटील (भांडुप), विक्रांत शिंदे (कल्याण), राम धर्मा थोरात (नाशिक), आलेखा शारबिद्रे (रत्नागिरी).
व्यासपीठावर मुख्य अभियंता, धनंजय औंढेकर, कैलास हुमणे, मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी, संजय ढोके, सह मुख्य जनसंपर्क अधिकारी, अनिल कांबळे, महाव्यवस्थापक (मानव संसाधन), राजेंद्र पांडे, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी, रामगोपाल अहिर, नाट्य स्पर्धेचे परीक्षक श्री.रविंद्र सावंत, ज्योती मिसाळ, गजानन कराळे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य अभियंता धनंजय औंढेकर, संचालन,अनिता चौधरी, शरद मोकल, संगीता चव्हाण, शर्वरी पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन वाशी मंडळाचे अधीक्षक अभियंता राजाराम माने यांनी केले. या कार्यक्रमाला यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी भांडुप परिमंडला अंतर्गत सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली असून वाशी मंडळातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली आहे.


अजून बातम्या वाचा..

अश्विन मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 10/020/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

अश्विन मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 10/020/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
.