मनमाड – सर्वच सरकारे ही एकाच माळेचे मणी असून मागील सत्तेत असलेले आणि विद्यमान सत्ताधारी सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नाबद्दल असलेली अनास्थेमुळे शेतकऱ्यांना डाव्या हाताने मारायचे की उजव्या हाताने मारायचे असा प्रश्न सध्या पडला आहे, असा हल्लाबोल आज स्वाभीमानीचे राजू शेट्टी यांनी केला.
सातत्याने निसर्गाचा होणारा कोप, पावसाची अनिश्चितता आहे. कमी वेळ त जास्त पाऊस पडण्याचे प्रमाण वाढल्याने ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण होते.यामुळे बळीराजा संकटात सापडतो. एनडीआरएफचा निकष देखील बदलावे लागणार आहेत, असंही राजू शेट्टी म्हणाले.
यंदा सर्वत्र पावसाने जोरदार हजेरी लावल्याने ओला दुष्काळ परिस्थिती असताना सध्याचे सरकार ओला दुष्काळ जाहीर करत नसल्याचे खंत व्यक्त करत विरोधी पक्ष गप्प असून विरोधी पक्षातले नेते नोटिसामुळे भेदरलेले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना पाठीराखा नसल्याची टीका देखील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी मनमाड येथील विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केली.