loader image
[ays_poll id=7]

बघा व्हिडिओ – मनमाड गुरुद्वाराचे सामाजिक कार्य उल्लेखनीय – ना. भुसे

Nov 8, 2022


आज संत गुरुनानक यांची ५५३ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत असून मनमाड शहरातील प्रसिद्ध गुरुद्वाराला विशेष महत्त्व आहे.काल राज्याचे बंदरे आणि खनिकर्म मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे, आमदार सुहास कांदे यांनी भेट देत गुरुद्वारामध्ये माथा टेकत भक्तिभावाने दर्शन घेतले. गुरुद्वाराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे तर राज्यभरातून नागरिक दर्शनासाठी दाखल झाले आहे.

नांदेड नंतर महत्वपूर्ण आणि मानाचा मानल्या गेलेल्या येथील प्रसिद्ध ‘गुप्तसर साहिब’ गुरुद्वारामध्ये उद्या ता ७ रोजी संत गुरुनानक यांच्या ५५३ व्या जन्मसोहळ्यानिमित्त दोन दिवशीय धार्मिक कार्यक्रमांसह अखंड पाठाचे आयोजन करण्यात आले आहे. संत गुरुनानक यांच्या दर्शनासाठी व महाप्रसादासाठी भाविकांनी गुरुद्वारामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. येथील गुरुद्वाराचे महत्व पाहता राज्याचे बंदरे आणि खनिकर्म मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे, आमदार सुहास कांदे यांनी भेट दिली. यावेळी गुरुद्वारामध्ये असलेल्या लंगरमध्ये जात मंत्री भुसे आमदार कांदे यांनी पाहणी केली. यावेळी गुरुद्वारामध्ये जात त्यांनी दर्शन घेतले यावेळी गुरुद्वारातर्फे मंत्री भुसे आणि आमदार कांदे यांचा गुरुद्वाराचे प्रबंधक बाबा रणजितसिंग यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित भाविकांना मंत्री भुसे, आमदार कांदे यांनी संबोधित केले. गुरुद्वारास काही मदत लागल्यास मदत करण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी बाळासाहेबांची शिवसेना गटाचे शहरप्रमुख मयुर बोरसे, माजी नगराध्यक्ष साईनाथ गिडगे, सुनील हांडगे, अमीन पटेल आदी उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

  महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक ओळखीचा अविभाज्य भाग म्हणजे आषाढी एकादशीची वारी —...

read more
“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

  नांदगाव: मारुती जगधने महाराष्ट्र शासनाने "विकसित भारत २०४७" या राष्ट्रीय उद्दिष्टानुसार...

read more
मनमाड महाविद्यालयात स्व.लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन व वृक्षारोपण संपन्न

मनमाड महाविद्यालयात स्व.लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन व वृक्षारोपण संपन्न

मनमाड = कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड येथे शिक्षण महर्षी, महात्मा गांधी विद्यामंदिर व...

read more
.