मनमाड : ( योगेश म्हस्के )भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेचे आयोजन ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन मनमाड व मनमाड बॉईज यांच्या संयुक्त विद्यमाने दिवंगत अशोक मगर चषक राज्यस्तरीय फुटबॉल सर्धा २०२२ चे उद्घाटन पोलिस उपअधीक्षक समरसिंग साळवे, यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी मा.नगराध्यक्ष गणेश धात्रक ,मा.नगराध्यक्ष राजेंद्र पगारे, राष्ट्रवादी सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र जाधव, सामाजिक कार्यकर्ते निलेश इंगळे , झोनल सचिव सतिश केदारे झोनल कार्यकारिणी सदस्य प्रविण अहिरे , विजय गेडाम , मा.नगरसेवक संजय निकम, कारखाना उप प्रबंधक निबेंकर , पत्रकार बब्बुभाई शेख, मनसे शहराध्यक्ष सचिन शिरूड,सी.आर.एम.एस.कारखाना शाखा चे अध्यक्ष प्रकाश बोडके, ऑल इंडिया ओ.बी.सी.रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन कारखाना शाखा चे अध्यक्ष रतन निकम,पापा थॉमस, पत्रकार अमोल खरे, पत्रकार नरहरी उंबरे, पत्रकार रईस शेख,पत्रकार योगेश म्हस्के, पत्रकार नाना अहिरे, ज्युनिअर इन्स्टिट्यूट ऑफ मनमाड चे सचिव संदीप धिवर, सिनियर सेक्सन इंजिनिअर एम.के.शिवारे, वसंत सोनवणे, ओपन लाईन चे अध्यक्ष प्रदीप गायकवाड, चेतन अहिरे, रत्नदिप पगारे आदी उपस्थित होते.
दिनांक ०९नोव्हेंबर ते १३नोव्हेंबर २२ या दरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर रेल्वे क्रिडांगण मनमाड येथे संपन्न होणार आहे. उद्धघाटन प्रसंगी टी.डी. बॉईज देवलाली विरुद्ध मनमाड बॉईज या दोन संघ मध्ये झाला.
टी.डी.बॉईज देवळाली संघाने २-१विजय प्राप्त केला.रुपेश पारटे याला उत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरविण्यात आले.सदर सामनाचे पंच म्हणून झियॉन,जुबेन, आनंद काम केले.सदर स्पर्धेसाठी मराठवाडा, विदर्भ, अहमदनगर, मुंबई, नाशिक, आदी ठिकाणांचे १६संघ सहभागी झाले होते.
कारखाना शाखा चे कार्याध्यक्ष सिद्धार्थ जोगदंड, कारखाना शाखा चे उपाध्यक्ष सागर गरूड, हर्षद सुर्यवंशी, संदिप पगारे, ओपन लाईन चे सचिव चेतन अहिरे, कोषाध्यक्ष रत्नदिप पगारे, सतिश झाल्टे, विनोद खरे, सम्राट गरुड, अजित जगताप, मनमाड बॉईज चे रहिम पठाण, विलास शिरूड,गोपी जगधने,मोसिम खान राहुल सातदिवे, रोहित बारसे,फराहण बेग, तुषार पाटील,समिर शेख, आदीने दिली.