loader image

बघा व्हिडिओ – मनमाडच्या कांत परिवाराने ‘तैवान देशात’ साजरी केली श्री गुरुनानकजी जयंती

Nov 10, 2022


मनमाड : ( योगेश म्हस्के )येथील प्रसिद्ध व्यापारी आणि निराला स्टोअर्सचे संचालक श्री गुरूदीपसिंग कांत आणि व्यवसाया निमित्ताने तैवान या देशात स्थायिक झालेली त्यांची मुले गुरुविंदसिंग कांत आणि मनविंदसिंग कांत यांनी श्री गुरुनानक देवजी यांच्या जयंतीचे तैवान येथे आयोजन केले.

तैवान देशात गुरुद्वारा नसल्याने श्री गुरुनानकजी जयंती साजरी करण्यासाठी गुप्तसर साहिब गुरुद्वारा मनमाडच्या सहकार्याने मनमाड येथील गुरुद्वाराच्या दरबारातील धार्मिक कार्यक्रमांचे थेट प्रेक्षेपण तैवान येथील कार्यक्रमाच्या ठिकाणी करण्यात आले होते , तसेच मनमाड गुरुद्वाराचे ग्रंथजी दलेरसिंग सोनी यांना तैवान येथील श्री गुरुनानकजी जयंतीनिमित्त धार्मिक कार्यक्रम साजरे करण्याच्या उपस्थितीसाठी तेथील सरकारने विशेष परवानगी देऊन व्हिजा मंजुर करून दिला. मनमाड येथील कांत परिवाराने श्री गुरुनानकजी जयंतीनिमित्त किर्तन , प्रवचन , लंगर आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करून आपल्या देशाच्या भारतीय संस्कृतीचे दर्शन तैवान येथील नागरिकांना करुन दिले , या कार्यक्रमाला विविध देशातील नागरिक उपस्थित होते.

विशेष म्हणजे शीख समाजाची ओळख असणारी पगडी कार्यक्रमात उपस्थित नागरिकांना बांधण्यासाठी देखील खास येवला येथुन कलाकार राजवंश सिंग आणि रणजित सिंग यांना घेऊन जाण्यात आले होते.


अजून बातम्या वाचा..

.