मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक श्री. सी. आर विघ्ने साहेब यांची थेट बाजार समितीच्या आवारात सुरू असलेल्या लिलावाची पाहणी केली. बाजार समितीचे अधिकारी व कर्मचारी यांचे समवेत केलेल्या ह्या पाहणीत त्यांनी शेतकरी व व्यापारी वर्गाच्या अडी अडचणी जाणून घेतल्या व त्यावर तात्काळ कार्यवाही करण्याचे अधिकारी वर्गास सूचना दिल्या.
काय आहेत अडी अडचणी आणि समस्या
1) शेतकरी बांधवांनी लिलावाच्या वेळेत बदल करण्याची मागणी केली याआधी लिलाव सकाळी 10:30 वाजता सुरू होत असत सोमवार दि. 14/11/2022 पासुन कांदा व मका लिलाव हा सकाळी 09:30 वाजता सुरू करण्यात येणार आहे.
2) तसेच धान्य लिलाव दुपारी 12:30 वाजता सुरू होत असत सदर लिलाव देखील सकाळी 10:00 वाजता सुरू करण्याच्या हालचाली सुरु आहेत.
3) व्यापारी बांधवांच्या मागणीनुसार बाजार समितीचे कामकाज ऑनलाईन व संगणकीकृत करण्याचे काम जवळ जवळ पूर्ण झाले असून सध्या प्रायोगिक तत्वावर कामकाज चालू आहे यास वरिष्ठ कार्यालयाची परवानगी मिळताच बाजार समितीचे ऑनलाईन संगणक प्रणाली 100% क्षमतेने कार्यान्वित करण्यात येईल.
4) शेतकरी व व्यापारी वर्गाच्या मागणीनुसार बाजार आवारातील बंद व मोडकळीस असलेले शौचालय दुरुस्त करून शेतकरी व व्यापारी वर्गास उपलब्ध करून देण्यात आले आहे.
यावेळी सचिव विश्वास राठोड, अधिकारी बळीराम गायकवाड, साहेबराव घुगे, नानासाहेब उगले, वसंत घुगे, नितीन दराडे आदींसह बाजार समितीचे अन्य कर्मचारी यांसह व्यापारी बांधव तसेच शेतकरी उपस्थित होते.