loader image
[ays_poll id=7]

आता भाविकांना समाधीला हस्तस्पर्श करता येणार – शिर्डीकरांच्या पाठपुराव्याला यश

Nov 10, 2022

शिर्डीत भाविकांचे साईदर्शन आनंददायी व्हावे या शिर्डीकरांच्या पाठपुराव्याला मोठे यश मिळाले.काल बुधवारी झालेल्या बैठकीनंतर तत्काळ काचा हटवून भाविकांना समाधीला हस्तस्पर्श करून दर्शन घेणे सुरू करण्यात आले सामान्य भाविकांना साईसमाधीला हस्तस्पर्श करून दर्शन व द्वारकामाईत प्रवेश देण्याबरोबरच साईसंस्थानने अनेक क्रांतीकारी निर्णय घेतल्याची माहिती संस्थानच्या सीईओ भाग्यश्री बानायत यांनी दिली.

शिर्डीकरांच्या मागणीनुसार सामान्य भाविकांना समाधी मंदिरातील समाधी पुढील काच काढून दर्शन देणे, गर्दीच्या वेळी कमी उंचीची काच लावणे, व्दारकामाई मंदिरात आतील बाजूस भाविकांना प्रवेश देणे, ग्रामस्थांसाठी मंदिर परिसर गेटवर येणे-जाणेकरिता मार्ग मोकळा करणे, साईंची आरती सुरु असताना मंदिराची परिक्रमा करु देणे, मंदिर परिसरात लावण्यात आलेले जास्तीचे बॅरिगेट काढणे आणि श्री साईसच्चरित हे काही भाषेमध्ये कमी आहे ते लवकरात लवकर उपलब्ध करुन देणे आदीबाबत निर्णय घेण्यात आल्याची माहिती सीईओ बानायत यांनी दिली.

आज शिर्डीच्या सर्वपक्षीय ग्रामस्थांनी या मुद्दयासंदर्भात सीईओ बानायत यांची भेट घेतली यावेळी सीईओ बानायत व ग्रामस्थांमध्ये सौहार्द पुर्ण वातावरणात चर्चा होऊन अनेक विषय मार्गी लागले मंदिराची सुरक्षा व प्रशासनाचे कामकाज यांना बाधा न येऊ देता ज्या मागण्या मान्य होण्यासारख्या होत्या, त्या मागण्या बानायत यांच्याकडून ताबडतोब मान्य करण्यात आल्या. तसेच काही मागण्या टप्याटप्याने स्वीकारता येतील असे आश्वासनही बानायत यांनी सर्वपक्षीय ग्रामस्थांना दिले.

अजून बातम्या वाचा..

भाजपा मनमाड शहर मंडल तर्फे अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिन निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन

भाजपा मनमाड शहर मंडल तर्फे अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिन निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन

मनमाड - भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर 2014 मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या...

read more
रोटरी क्लब ऑफ मनमाड मॅजिक तर्फे मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर अनकाई येथे संपन्न

रोटरी क्लब ऑफ मनमाड मॅजिक तर्फे मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर अनकाई येथे संपन्न

  दिनांक 17 मंगळवार रोजी अनकाई येथे रोटरी क्लब ऑफ मनमाड मॅजिक आणि रोटरी आय हॉस्पिटल मालेगाव...

read more
महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड, ता. नांदगाव,जि. नाशिक महाविद्यालयास ‘स्वायत्त दर्जा’ प्रदान

महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड, ता. नांदगाव,जि. नाशिक महाविद्यालयास ‘स्वायत्त दर्जा’ प्रदान

  मनमाड :- महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड,...

read more
व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजाभाऊ पारीक, अनिल पारीक आणि द्वारकेश पारीक ह्यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ बुधवारी मनमाड बंद

व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजाभाऊ पारीक, अनिल पारीक आणि द्वारकेश पारीक ह्यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ बुधवारी मनमाड बंद

मनमाड -- मनमाड शहर व्यापारी महासंघ चे अध्यक्ष राजाभाऊ पारीक तसेच त्यांचे लहान बंधू अनिल पारीक व...

read more
.