loader image
[ays_poll id=7]

गुड शेफर्ड इंग्लिश स्कूल मध्ये तालुकास्तरीय योगासन स्पर्धा – ३० विद्यार्थ्यांचा सहभाग

Nov 10, 2022


नांदगाव तालुकास्तरीय योगासन स्पर्धेचे गुड शेफर्ड स्कुल मध्ये आयोजन करण्यात आले होते.क्रिडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत नांदगाव तालुका स्तरीय योगासन स्पर्धां मनमाड येथील गुड शेफर्ड स्कूल मध्ये आयोजीत करण्यांत आली होती. या स्पर्धेत एकूण 30 विद्यार्थ्यानी सहभाग घेतला. यामध्ये गुड शेफर्ड स्कूल, मनमाड, केंद्रिय विद्यालय, मनमाड, के. आर. टी. हायस्कुल, मनमाड, सेटं झेवियर्स हायस्कुल, मनमाड. या शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. योगासन स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी राष्ट्रीय वेटलिफ्टिंग प्रशिक्षक मा. प्रविण व्यवहारे सर, गुड शेफर्ड स्कूलचे प्राचार्य डॉ. क्लेमेंट नायडू, योगप्रशिक्षक मा. सुनिल ढमाले, श्री. स्वप्नील बाकळे सर, व श्री. विशाल झाल्टे सर मंचावर उपस्थित होते. प्रवीण व्यवहारे सर यांनी आपल्या मनोगतात योगाचे महत्त्व पटवून दिले. तसेच डॉ. क्लेमेंट नायडू यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात योगासनांमुळे विध्यार्थ्यांना अभ्यासात कशाप्रकारची मदत होते व जीवनातील नैराश्यावर मात करण्याचा मंत्र योगसाधनेमुळे प्राप्त करता येतो हे नमुद केले. स्पर्धेचे नियोजन गुड शेफर्ड शाळेचे क्रिडा शिक्षक. श्री. व्यंकटेश देशपांडे व श्री. परविंद्र हरनामसिंग रिसम यांनी केले. योगासन स्पर्धेच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुड शेफर्ड स्कूलचे शिक्षक श्री. भाऊसाहेब दाभाडे यांनी केले.


अजून बातम्या वाचा..

मनमाड  येथील सेंट झेवियर हायस्कूल मध्ये जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूल मध्ये जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूल मध्ये जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी...

read more
महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान वाणिज्य स्वायत्त महाविद्यालय येथील वाणिज्य विभागाचे कृषी उत्पन्न बाजार समिती मनमाड येथे अभ्यास भेट.

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान वाणिज्य स्वायत्त महाविद्यालय येथील वाणिज्य विभागाचे कृषी उत्पन्न बाजार समिती मनमाड येथे अभ्यास भेट.

मनमाड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीला वाणिज्य विभागातील विद्यार्थ्यांची औद्योगिक-शैक्षणिक भेट...

read more
मनमाड साहित्य संघाच्या काव्य स्पर्धा उत्साहात संपन्न.    – सेंट झेवियर्स हायस्कूलच्या कु. श्रद्धा शिंदे हिस प्रथम पुरस्कार.

मनमाड साहित्य संघाच्या काव्य स्पर्धा उत्साहात संपन्न. – सेंट झेवियर्स हायस्कूलच्या कु. श्रद्धा शिंदे हिस प्रथम पुरस्कार.

मनमाड (प्रतिनिधी)- मनमाड साहित्य संघा ने आयोजित केलेल्या शालेय विद्यार्थ्यांसाठींची काव्यस्पर्धा...

read more
.