Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

प्रकृती स्कूलमध्ये डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम जयंती साजरी

Oct 17, 2026

मनमाड : प्रकृती स्कूलमध्ये थोर शास्त्रज्ञ व भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.डॉ. कलाम यांनी आपल्या मेहनतीच्या, जिद्दीच्या आणि ज्ञानाच्या बळावर देशाच्या प्रगतीमध्ये मोलाचे योगदान दिले. साध्या परिस्थितीतून पुढे येत त्यांनी भारताच्या अंतराळ आणि क्षेपणास्त्र विकास क्षेत्रात महत्त्वपूर्ण कामगिरी केली. राष्ट्रपतीपदावर कार्यरत असतानाही त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याला आणि त्यांना मोठी स्वप्ने पाहण्यासाठी प्रेरित करण्याला विशेष महत्त्व दिले.

कार्यक्रमात शिक्षकांनी विद्यार्थ्यांना डॉ. कलाम यांच्या क्षेपणास्त्र निर्मितीच्या प्रक्रियेची व वैज्ञानिक कार्याची माहिती दिली. मुख्याध्यापक सौरभ जैन सर यांनी विद्यार्थ्यांना जीवनात निश्चित ध्येय ठेवून ते साध्य करण्यासाठी मेहनत, जिद्द आणि चिकाटीने प्रयत्न करण्याचा सल्ला दिला. उपमुख्याध्यापिका प्रीती परदेशी मॅडम यांनी प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे रोल मॉडेल कोण आहेत आणि त्यांची भविष्यातील स्वप्ने काय आहेत, याविषयी संवाद साधला.

या उपक्रमातून विद्यार्थ्यांना मोठी स्वप्ने पाहण्याची आणि ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्याची प्रेरणा मिळाली.

“ज्ञान, मेहनत आणि जिद्द यांच्या बळावर यशाचे शिखर गाठता येते,” हा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला.

अजून बातम्या वाचा..

माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वाघदर्डी येथे डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती व वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा

माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वाघदर्डी येथे डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती व वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा

माध्यमिक विद्यालय वागदर्डी येथे भारताचे माजी राष्ट्रपती, थोर शास्त्रज्ञ, मिसाईल मॅन डॉ. एपीजे...

read more
नांदगाव तालुकास्तरीय योग स्पर्धेत प्रकृती स्कूलच्या विद्यार्थ्यांचे उल्लेखनीय यश

नांदगाव तालुकास्तरीय योग स्पर्धेत प्रकृती स्कूलच्या विद्यार्थ्यांचे उल्लेखनीय यश

नांदगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय योग स्पर्धेत प्रकृती स्कूलच्या विद्यार्थ्यांनी...

read more
मनमाड येथे अग्रसेन जयंती उत्सव उत्साहात संपन्न ; महिला समितीच्या अध्यक्षपदी सौ.मनिषा रमेश अग्रवाल यांची निवड

मनमाड येथे अग्रसेन जयंती उत्सव उत्साहात संपन्न ; महिला समितीच्या अध्यक्षपदी सौ.मनिषा रमेश अग्रवाल यांची निवड

मनमाड येथे अहिंसा व समतेचे प्रतिक अग्रकुल प्रवर्तक छत्रपति महाराजाधिराज अग्रसेन जी भगवान यांचा...

read more
आगामी कुंभमेळ्यात आर्थिक लाभाबरोबर स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठी गती मिळेल – बाळकृष्ण भरतिया

आगामी कुंभमेळ्यात आर्थिक लाभाबरोबर स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठी गती मिळेल – बाळकृष्ण भरतिया

बारा वर्षानंतर गोदावरी तीरावर होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळा फक्त धार्मिक पर्वणी नाही तर...

read more
मनमाड–चांदवड राष्ट्रीय महामार्गावरील अपघातप्रवण ठिकाणी तातडीने उपाययोजना करा – गणेश धात्रक यांचे निवेदन

मनमाड–चांदवड राष्ट्रीय महामार्गावरील अपघातप्रवण ठिकाणी तातडीने उपाययोजना करा – गणेश धात्रक यांचे निवेदन

कालची मनमाड - अहिल्यानगर रोड वर घडलेल्या अपघातात 19 वर्षीय तरुणीने आपला जीव गमावल्याची घटना ताजी...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]