loader image

महाराष्ट्र मुस्लिम शाह छप्परबंद सामाजिक विकास मंडळ तर्फे मनमाड मध्ये भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांची जयंती साजरी

Nov 11, 2022


महाराष्ट्र मुस्लिम शाह छप्परबंद सामाजिक विकास मंडळ मनमाड शहर च्या वतीने भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांची134 वी जयंती मौलाना आजाद हॉल येथे साजरी करण्यात आली.दरवर्षी 11 नोव्हेंबर हा दिवस भारतात राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस भारताचे पहिले शिक्षण मंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांना समर्पित आहे. देशाचे थोर स्वातंत्र्यसेनानी, विद्वान आणि प्रख्यात शिक्षणतज्ञ अबुल कलाम आझाद यांची जयंती लोक राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून साजरी करतात. देशाच्या उभारणीत आणि देशाच्या विकासात चांगले शिक्षण किती महत्त्वाचे आहे हे स्वातंत्र्यानंतर आझाद यांना चांगलेच ठाऊक होते. अशा परिस्थितीत देशात आधुनिक शिक्षण व्यवस्था आणण्यासाठी त्यांनी अनेक मोठी पावले उचलली. आज राष्ट्रीय शिक्षण दिनानिमित्त त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट कार्याचे स्मरण होत आहे.

11 सप्टेंबर 2008 रोजी केंद्र सरकारने अबुल कलाम आझाद यांची जयंती 11 नोव्हेंबर हा राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा केली होती. तेव्हापासून देशातील सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये ११ नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय शिक्षण दिन साजरा केला जातो. जेशिक्षण मंत्रालयाने आझाद यांच्या नेतृत्वाखाली 1951 मध्ये देशातील पहिली IIT स्थापन केली. यानंतर 1953 मध्ये विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) स्थापन करण्यात आला. या संस्था भविष्यात भारताच्या उच्च शिक्षण क्षेत्रात महत्त्वपूर्ण ठरतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यांच्या कार्यकाळात अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (AICTE) आणि माध्यमिक शिक्षण आयोगाची स्थापना करण्यात आली. देशातील प्रसिद्ध जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाच्या स्थापनेतही त्यांचा मोलाचा वाटा होता.

दरवर्षी 11 नोव्हेंबर या दिवशी सर्व शाळा आणि महाविद्यालयांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या दिवशी विद्यार्थी आणि शिक्षक साक्षरतेचे महत्त्व आणि शिक्षणाच्या विविध पैलूंबद्दल त्यांचे विचार मांडतात. विविध सेमिनार आणि कार्यशाळा आयोजित केल्या जातात. विविध शाळांमध्ये निबंध, भाषण, पोस्टर मेकिंग स्पर्धा आयोजित केल्या जातात. याकार्यक्रम चे अध्यक्ष .मनमाड नगर पालिका शहर अभियान व्यवस्थापक मा. संदीप अगोने साहेब, भूमी अभिलेख चे निनावरे साहेब, छप्परबंद शाह समाजचे युवा अध्यक्ष अकबर शाह , यांनी मौलाना आजाद यांच्या जीवनाचे परिचय करून माहेती दिली यावेळी बी जी पी चे बुढन बाबा, फुले शाहू आंबेडकर मंच चे फिरोज शेख युवा प्रभारी इम्रान शाह, जावेद तांबोली, फिरोज खान, नाविद शाह, शब्बीर शाह, शाहरुख मनियार, मुशीर शेख, गुड्डू शाह, दिलावर शेख, अजीम शाह व इतर सामाजीक व राजकीय व छप्परबंद शाह समाजाचे युवा कार्यकते उपस्थित होते..


अजून बातम्या वाचा..

अश्विन मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 10/020/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

अश्विन मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 10/020/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
.