सालाबादप्रमाणे येथील आठवडे बाजारातील राजस्थानी बालाजी मंदिरात अन्नकुट ( महाप्रसाद ) कार्यक्रम शुक्रवार दिनांक ११/११/२०२२ रोजी आयोजित करण्यात आला होता. कोविड मुळे गत दोन वर्षात निर्बंधांमुळे कार्यक्रम आयोजन करता आले नव्हते. मात्र निर्बंध शिथिल झाल्यामुळे या वर्षी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. फुलांची आकर्षक सजावट तसेच पणत्यांची आरास भाविकांची लक्ष वेधून घेत होते.दुपारी १२ वाजता राजस्थानी समाजातील ज्येष्ठ सदस्यांच्या हस्ते आरती होऊन महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला.व्यंकटेश बालाजीच्या मूर्तीला ५६ भोग अर्पण करण्यात आला होता.आमदार सुहास कांदे यांनी फोन वरून कार्यक्रमास शुभेच्छा व्यक्त केल्या. ह्या कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष प्रवीण नाईक,गणेश धात्रक, संतोष बळीद, फरहान खान,किरण देवरे,योगेश (बबलू) पाटील,मयूर बोरसे,महावीर ललवाणी,उमेश ललवाणी,उमेश गांधी,पप्पू परब, शैलेश सोनवणे,राजू आहेर, आदींसह समाज बांधव, बंधू भगिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन राजस्थानी बालाजी मंदिर ट्रस्ट तर्फे करण्यात आले.