loader image
[ays_poll id=7]

राशी भविष्य : १४ नोव्हेंबर २०२२ – सोमवार

Nov 14, 2022


मेष- आज चंद्र रास बदलून मेष राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र प्रथम स्थानी असेल. आजच्या दिवसाची सुरवात आपण स्फूर्तीने व उत्साहाने कराल. मित्र व सगे सोयरे यांच्या येण्या जाण्याने घरातील वातावरण आनंदाचे राहील.

वृषभ- आज चंद्र रास बदलून मेष राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र बारावा स्थानी असेल. आज कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका. आज गैरसमज होण्याची शक्यता आहे. प्रकृती खराब असल्यामुळे मन उदास बनेल.

मिथुन- आज चंद्र रास बदलून मेष राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र लाभात स्थानी असेल. आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील. समाजात मान व प्रतिष्ठा वाढेल. मित्रांकडून फायदाही होईल व त्यांच्यासाठी पैसेही खर्च होतील.

कर्क- आज चंद्र रास बदलून मेष राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र दशमात स्थानी असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. व्यापारी वर्गास लाभ होईल. नोकरीत बढती संभवते. कुटुंबात एकोपा राहील.

सिंह- आज चंद्र रास बदलून मेष राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र भाग्यात स्थानी असेल. आजचा दिवस आळस व थकवा ह्यात जाईल. आपल्या तापट स्वभावामुळे मानसिक तणाव राहील. पोट दुखीने हैराण व्हाल.

कन्या-आज चंद्र रास बदलून मेष राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र अष्टमात स्थानी असेल. आज आपल्या आहाराची विशेष काळजी घ्यावी लागेल. अती उत्साह व क्रोधाचे प्रमाण वाढल्याने आरोग्यावर ताण येण्याची शक्यता आहे. बोलण्यावर संयम ठेवावा लागेल.

तूळ- आज चंद्र रास बदलून मेष राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र सातवा स्थानी असेल. आज सांसारिक जीवनाचा आनंद खर्‍या अर्थाने लुटाल. सामाजिक हेतूने कुटुंबीयांसह बाहेर जावे लागेल.

वृश्चिक- आज चंद्र रास बदलून मेष राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र सहावा स्थानी असेल. आज आपण निश्चिंतपणा व सुखशांतीमध्ये घरात वेळ घालवाल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य कार्य करण्यासाठी उत्साह देईल.

धनु- आज चंद्र रास बदलून मेष राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र पाचवा स्थानी असेल. आजचा दिवस प्रतिकूलतेचा असून, प्रवासात त्रास संभवतो. संततीचे आरोग्य व अभ्यास ह्यांची काळजी राहील. कामे अपूर्ण राहिल्याने नैराश्य येईल.

मकर- आज चंद्र रास बदलून मेष राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र चवथा स्थानी असेल. आज आपली मनःस्थिती व आरोग्य चांगले राहणार नाही. कौटुंबिक कटकटीमुळे मन दुःखी होईल. उत्साह व आनंद यांचा अभाव राहील. स्वजनांशी मतभेद होतील.

कुंभ- आज चंद्र रास बदलून मेष राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र तिसरा स्थानी असेल. चिंता दूर झाल्याने मानसिक स्वास्थ्य मिळेल. मनात उत्साह संचारल्यामुळे पूर्ण दिवस आनंदात जाईल.

मीन- आज चंद्र रास बदलून मेष राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र दुसरा स्थानी असेल. वाद व संघर्ष टाळण्यासाठी वाणीवर नियंत्रण ठेवावे लागेल. खर्चावर नियंत्रण ठेवण्याची गरज भासेल. आर्थिक देवाण – घेवाणीचे व्यवहार करताना सावध राहावे लागेल.


अजून बातम्या वाचा..

.