मनमाड : भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू जयंती निमित्त एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये बाल दिवस साजरा साजरा करण्यात आला.
या वेळी शाळेतील विदयार्थीनी नौशिन शेख मुश्ताक (इ.६वी), मशिरा शेख शाकिर (इ.७ वी ), मिश्कात शेख अश्फाक (इ.११ वी विज्ञान शाखा) व उपशिक्षक खान युनूस दिलावर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जीवनकार्याची माहिती देऊन बाल दिवस त्यांच्या जन्मदिवशी का साजरा केला जातो.या बाबतचे महत्व विशद केले.शाळेचे मुख्याध्यापक श्री.भूषण शेवाळे सर संस्थेचे सदस्या आयशा गाजीयानी मॅडम संस्था व शाळा समन्वयक श्री. अमोल निकम सर पर्यवेक्षक अन्सारी शाहीद अख्तर, शेख आरीफ कासम यांनी बाल दिवसाच्या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन उपशिक्षक खान अनिस सर यांनी केले. संस्था व शाळा समन्वयक श्री. अमोल निकम सर यांचे मार्गदर्शन लाभले.

राशी भविष्य : ११ ऑक्टोबर २०२५ – शनिवार
मेष : भाग्यकारक घटना घडेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. वृषभ : काहींना...