loader image
[ays_poll id=7]

जे.टी.कासलीवाल स्कूल मध्ये बालदिन विविध उपक्रमांनी साजरा

Nov 14, 2022


नांदगाव
नांदगाव येथील जे. टी. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये विविध उपक्रमांनी १४ नोव्हेबंर बालदिन उत्साहात साजरा करण्यात आला.

दरवर्षीप्रमाणे १४ नोव्हेंबरला पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस हा बालदिन म्हणून शाळेत साजरा केला जातो. बाल दिनानिमित्त शाळेमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात पंडित नेहरूंच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आली.
यावेळी क.मा.कासलीवाल माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक श्री. संदिप आहेर,श्री. संजय शिवदे ,श्री. राहुल आहेर उपस्थित होते. तसेच सर्व विद्यार्थी, शिक्षक, व काही पालकही उपस्थित होते. अनेक विद्यार्थ्यांनी नेहरूंजीचे आवडते फूल गुलाब देखील आणले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी आपले गोड मनोगत ही व्यक्त केले.
नेहरूजींचे उत्तम विचार शाळेतील शिक्षिका रिटा उबाळे, प्रियंका राजपूत, शालिनी गोयल यांनी विद्यार्थ्यांन समोर मांडले.या कार्यक्रमाचे खास वैशिष्ट्ये म्हणजे शाळेतील परिपाठ शिक्षकांनी सादर केला.तसेच समूह नृत्य शाळेतील शिक्षिका मृणाल बागूल,प्रियंका राजपूत ,रूपाली घूघे यांनी सादर केले. तर सरोज ञिभूवन ,विनोद आहिरे या शिक्षकांनी सुंदर गिते सादर करून शालेय वातावरण मंञमुग्ध केले. यावेळी विद्यार्थ्यांनसाठी वेगवेगळ्या खेळांचे आयोजन करण्यात आले होते. या मध्ये विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभागी होऊन आपला प्रतिसाद नोंदवला.
कार्यक्रमाच्या शेवटी प्रत्येक क्लासमध्ये केक कटिंग करण्यात आला.तसेच चाॅकलेट विद्यार्थ्यांना वाटण्यात आले. कार्यक्रमाचे सर्व नियोजन प्राचार्य मणी चावला यांच्या अध्यक्षतेखाली शाळेतील सर्व शिक्षकांनी मिळून केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शैलेंद्र दामले व आभार प्रदर्शन कविता चौधरी यांनी केले.
सर्व विद्यार्थ्यांना संस्थेचे चेअरमन मा श्री सुनिलकुमारजी कासलीवाल तसेच संस्थेचे सचिव विजय चोपडा, सरचिटणीस प्रमिलाताई कासलीवाल, जुगलकिशोर अग्रवाल, रिखबचंद कासलीवाल, महेंद्र चांदिवाल प्रशासकीय प्रमुख प्रकाश गुप्ता, स्कूलचे प्राचार्य मनी चावला, शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी यांनी बालदिनानिमित्ताने शुभेच्छा दिल्या.


अजून बातम्या वाचा..

मनमाड  येथील सेंट झेवियर हायस्कूल मध्ये जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूल मध्ये जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूल मध्ये जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी...

read more
महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान वाणिज्य स्वायत्त महाविद्यालय येथील वाणिज्य विभागाचे कृषी उत्पन्न बाजार समिती मनमाड येथे अभ्यास भेट.

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान वाणिज्य स्वायत्त महाविद्यालय येथील वाणिज्य विभागाचे कृषी उत्पन्न बाजार समिती मनमाड येथे अभ्यास भेट.

मनमाड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीला वाणिज्य विभागातील विद्यार्थ्यांची औद्योगिक-शैक्षणिक भेट...

read more
मनमाड साहित्य संघाच्या काव्य स्पर्धा उत्साहात संपन्न.    – सेंट झेवियर्स हायस्कूलच्या कु. श्रद्धा शिंदे हिस प्रथम पुरस्कार.

मनमाड साहित्य संघाच्या काव्य स्पर्धा उत्साहात संपन्न. – सेंट झेवियर्स हायस्कूलच्या कु. श्रद्धा शिंदे हिस प्रथम पुरस्कार.

मनमाड (प्रतिनिधी)- मनमाड साहित्य संघा ने आयोजित केलेल्या शालेय विद्यार्थ्यांसाठींची काव्यस्पर्धा...

read more
.