loader image
[ays_poll id=7]

राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेत जालना संघाने मारली बाजी

Nov 15, 2022

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेचे आयोजन ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन मनमाड व मनमाड बॉईज (क्लासिक बॉईज) यांच्या संयुक्त विद्यमाने दिवंगत अशोक मगर चषक राज्यस्तरीय फुटबॉल सर्धा २०२२ दिनांक ०९नोव्हेंबर ते १३नोव्हेंबर २०२२ या दरम्यान डॉ बाबासाहेब आंबेडकर रेल्वे क्रिडांगण मनमाड येथे संपन्न झाल्या. सदर राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभाच्या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून मा.नगराध्यक्ष राजाभाऊ पगारे, झोनल सचिव सतिश भाऊ केदारे,मा.नगराध्यक्ष गणेश धात्रक, झोनल कार्यकारिणी सदस्य प्रविणभाऊ अहिरे सामाजिक कार्यकर्ते निलेश इंगळे, NRMU चे ओपन लाईन चे अध्यक्ष अंबादास निकम, स्वप्निल अरोरा, राष्ट्रवादी सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र जाधव, सन्नी अरोरा, ज्युनिअर इन्स्टिट्यूट ऑफ मनमाड चे सचिव संदीप धिवर, ओपन लाईन चे अध्यक्ष प्रदीप गायकवाड, कारखाना शाखा चे कार्याध्यक्ष सिद्धार्थ जोगदंड, कारखाना शाखा चे उपाध्यक्ष सागर गरूड पत्रकार अमिन शेख,पापा थॉमस, संजय कटारे,वसंत सोनवणे कारखाना शाखा चे वरीष्ठ उपाध्यक्ष संदिप पगारे, मध्य रेल्वे मजदूर संघ कारखाना शाखा चे अध्यक्ष प्रकाश बोडके, गणेश हडपे आदी उपस्थित होते.
अंतिम सामना डी.सी.सी.नाशिक विरूद्ध आर.आर.सी. जालना या दोन संघांत झाले.
निर्धारित वेळेत दोन्ही संघांनी एक एक गोल केले
शेवटी पेनल्टी शुट आऊट मध्ये जालना संघाने ४-३ गोलने अंतिम सामना जिंकला.
तर तृतीय क्रमांकाचे पारितोषिक टी.डी.बॉईज देवळाली संघ ला देण्यात आले तर चौथ्या क्रमांकाचे पारितोषिक शिवाजी स्पोर्ट्स अहमदनगर संघाला देण्यात आले.
सामनावीर पुरस्कार जलान अजमल (जालना) तर मालिकेतील उत्कृष्ट खेळाडू म्हणून जमाल अजमल (जालना) यांना देण्यात आला.
तसेच उत्कृष्ट गोलकिपरचे पारितोषिक नाशिक संघाचा बिजू यांना देण्यात आले
उत्कृष्ट डिफेन्स चे पारितोषिक नाशिक संघाचा राकेश कुमार यांना देण्यात आले.
उत्कृष्ट फारवड खेळाडू चे बक्षिस जालन्याच्या जलान अजमल देण्यात आले.
अंतिम सामन्यासाठी मुख्य पंच आनंद पांडे हे होते तर झियॉन व जुबेन हे उपपंच होते

सदर स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक चे बक्षिस रु.३१०००/- व चषक माजी नगराध्यक्ष गणेश भाऊ धात्रक व ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशनचे ओपन लाईन शाखा चे कार्यालय सचिव निलेश इंगळे यांच्या तर्फे देण्यात आले.
व्दितीय क्रमांक चे बक्षिस रू २१०००/- व चषक मा.नगरसेवक बब्बु कुरैशी व राष्ट्रवादी सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र जाधव यांच्या तर्फे देण्यात आले.
तृतीय क्रमांकाचे बक्षिस रू ११०००/- व चषक मा नगरसेवक संजय निकम व सन्नी अरोरा यांच्या तर्फे देण्यात आले.
चतृर्थ क्रमांक चे बक्षिस रू ७०००/- व चषक इम्रान मोमिन व इरफान मोमिन यांच्या कडून देण्यात आले. या आयोजनासाठी मा नगरध्यक्ष राजाभाऊ पगारे यांचे मोलाचे सहकार्य प्राप्त झाले आहे.
तसेच प्रत्येक सामन्यातील उत्कृष्ट खेळाडू चषक ज्युनिअर इन्स्टिट्यूट ऑफ मनमाड चे सचिव संदीप धिवर यांच्या कडून देण्यात आले.
अंतिम सामन्यातील उत्कृष्ट गोलकिपर चे बक्षिस पत्रकार अमिन शेख यांच्या कडून रोख रक्कम ११००/-देण्यात आले.
तसेच अंतिम सामन्यातील सर्व चषक ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशनचे ओपन लाईन शाखाचे कार्यकारिणी सदस्य वसंत सोनवणे यांच्या कडून देण्यात आले.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी झोनल सचिव सतिश भाऊ केदारे, ओपन लाईन शाखा चे अध्यक्ष प्रदीप गायकवाड, झोनल कार्यकारिणी सदस्य प्रविणभाऊ अहिरे, कारखाना शाखा चे कार्याध्यक्ष सिद्धार्थ जोगदंड, माजी अतिरिक्त सचिव किरण आहीरे कारखाना शाखा चे उपाध्यक्ष सागर गरूड, सुभाष जगताप, कल्याण धिवर सुनिल सोनवणे, सागर गरूड,ओपन लाईन चे सचिव चेतन अहिरे, कोषाध्यक्ष रत्नदिप पगारे, विनोद खरे,दिपक अस्वले, सम्राट गरुड,अजित जगताप, मनमाड बॉईज चे रहिम पठाण, विलास शिरूड,गोपी जगधने,मोसिम खान, राहुल सातदिवे,समीर शेख,रोहन बारसे, रेहान झेवियर, तुषार पाटील, मंगेश जगताप, प्रशांत एळीजे, दिपक बागुल, राहुल केदारे, अर्जुन बागुल आदीनी परिश्रम घेतले.

अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या...

read more
कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

आज दिनांक 13 नोव्हेंबर 2025 रोजी नाशिक कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र...

read more
कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

दिनांक :12/11/2025   कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या...

read more
मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न झाली....

read more
नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

  मुंबई, दि. १३ - नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांकरिता संकेतस्थळावर फक्त...

read more
एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद जयंती उत्साहात साजरी

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद जयंती उत्साहात साजरी

  *मनमाड (दि. ११ नोव्हेंबर) - एच.ए.के.हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, मनमाड येथे भारताचे पहिले...

read more
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक आयोजित

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक आयोजित

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी...

read more
.