भारतीय स्वातंत्र्य संग्रामा मध्ये ब्रिटिश सरकार विरोधात मोठा संघर्षमय लढा देणाऱ्या थोर क्रांतिकारक स्वर्गीय बिरसा मुंडा यांची 147 व्या जयंती निमित्ताने मनमाड शहर भाजपा मंडल तर्फे त्यांना अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भाजपा नासिक जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे, भाजपा मनमाड शहर अध्यक्ष जयकुमार फुलवाणी भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा जिल्हा अध्यक्ष जलील अन्सारी आदी प्रमुख पदाधिकारी मंचावर उपस्थित होते. भाजपा युवा कार्यकर्ते व शहर सचिव मयूर माळी यांचे हस्ते स्वर्गीय बिरसा मुंडा यांचे प्रतिमेस माल्याअर्पण करण्यात आले. जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे यांनी बिरसा मुंडा यांचे बद्दल माहिती सांगितली या कार्यक्रम मध्ये सुरेश बोरसे यांनी मान्यवराचे उपस्थित मध्ये भाजपात प्रवेश केला. कार्यक्रम चे सूत्र संचलन भाजपा मनमाड शहर संघटन सरचिटणीस नितीन परदेशी यांनी केले या कार्यक्रमाला भाजपा दिव्यांग आघाडी चे शहर अध्यक्ष दीपक पगारे, भाजपा ओबीसी आघाडी नासिक जिल्हा चिटणीस गौरव ढोले, शहर उपाध्यक्ष बुधन बाबा शेख,भाजपा ट्रान्सपोर्ट आघाडी जिल्हा उपाध्यक्ष मुकेश पाटील, शहर सचिव धीरज भाबड,भाजपा भटके विमुक्त आघाडी चे जिल्हा सरचिटणीस अकबर शहा, अजय बोरसे, निकेश वानखेडे आदी प्रमुख पदाधिकारी सह भाजपा कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते कार्यक्रम चे संयोजन भाजपा मनमाड शहर अध्यक्ष जयकुमार फुलवाणी, जलील अन्सारी, दिपक पगारे यांनी केले.