loader image
[ays_poll id=7]

निलमणी ट्रस्ट ची गणेशोत्सवाची परंपरा गौरवास्पद – मनमाड शहर पोलीस ठाण्यातर्फे गौरव

Nov 16, 2022

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणारा गणपती म्हणून पंचक्रोशी मध्ये प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात दरवर्षी भाद्रपद महागणेश उत्सव साजरा करण्यात येतो या उत्सवात श्री निलमणी गणेश मंडळ तर्फे मनमाड शहरात स्थापना व विसर्जन या दोन्ही दिवसाच्या मिरवणूका सकाळी काढण्याची परंपरा सुरु करण्यात आली. यंदाचे उत्सवाचे 26 वे वर्ष होते. यंदाही सकाळी मिरवणुकी ची उत्तम परंपरा मंडळ तर्फे अखंडित ठेवण्यात आली म्हणून मनमाड शहर पोलीस स्टेशन तर्फे श्री निलमणी गणेश मंडळाला गौरव प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या परंपरेला सुरु ठेवणे साठी दरवर्षी अनमोल सहकार्य करणाऱ्या सर्व श्री गणेश भक्त, वाद्यवृंद , व सर्व पत्रकार मित्र, नागरिक,पोलीस प्रशासन यांचे विश्वस्त मंडळ,श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट मनमाड ऋण व्यक्त केले आहे.

अजून बातम्या वाचा..

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

  मनमाड - शहरात गेली 29 वर्ष कार्यरत असलेली व मनमाड शहराची अर्थ वाहिनी असलेल्या प्रगती अर्बन...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

मनमाड - BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

मनमाड- महाराष्ट्र बास्केटबॉल असोसिएशन यांच्या मान्यतेने तसेच नाशिक डिस्ट्रिक्ट बास्केटबॉल असोसिएशन...

read more
.