loader image
[ays_poll id=7]

क्षेत्र भेटीतून विद्यार्थ्यांना दिला प्रत्यक्ष ज्ञानाचा अनुभव

Nov 17, 2022

सौ .कमलाबाई माणिकचंद कासलीवाल प्राथमिक विद्यालयाच्या विद्यार्थी दैनंदिन व्यवहारात पारंगत व्हावे तसेच कायदा व सुव्यवस्था यांची माहिती विद्यार्थ्यांना मिळावी या उद्देशाला अनुसरून विद्यार्थ्यांना पोस्ट ऑफिस ला भेट देऊन तेथील कामकाज कसे चालते याविषयी माहिती जाणून घेतली. डाक सहाय्यक दत्तात्रय भावसार यांनी विद्यार्थ्यांना टपाल कार्यालयातील कामकाज कशाप्रकारे चालते याविषयी माहिती सांगितली. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष टपाल कार्यालयातील व्यवहार कसा चालतो याविषयी माहिती मिळावी या उद्देशाने विद्यार्थ्यांना प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक व्ही.पी सावंत सर यांनी डाक कार्यालयाला विद्यार्थ्यांची भेट घडवून आणली.या भेटीत विद्यार्थ्यांनी आपले काही प्रश्न सुद्धा विचारले आणि आपले ज्ञान वृद्धिंगत केले.
तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसण्यासाठी व मुलांना सुरक्षिततेची जाणीव होण्यासाठी आणि शस्त्रांची माहिती मिळावी यासाठी पोलीस स्टेशन येथे क्षेत्रभेट देण्यात आली. तेथे सहाय्यक पोलीस निरीक्षक ईश्वर पाटील सर यांनी विद्यार्थ्यांना शस्त्रांची अतिशय उपयुक्त माहिती सांगितली तसेच रायफल चालवण्याचे प्रात्यक्षिक देखील करून दाखविले तेथे उपस्थित मोरेदादा यांनी विद्यार्थ्यांना सत्याच्या मार्गावर चालण्याची शिकवण दिली. तसेच सोनवणे दादा, मुंडे दादा यांनी सहकार्य केले .शाळेने राबवलेल्या या कार्यक्रमाचे संस्थेचे चेअरमन मा.श्री.सुनिलकुमार कासलीवाल,सचिव विजय चोपडा,प्रशासक प्रकाश गुप्ता,सरचिटणीस प्रमिलाताई कासलीवाल,संचालक महेंद्र चांदिवाल,मुख्याध्यापक श्री.व्ही.पी.सावंत यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री.सिध्दार्थ जगताप,ईश्वर फणसे,अभिजित थोरात,विजय जाधव,श्रीमती. धन्वंतरी देवरे,निलोफर पठाण,जयश्री चोळके,अनिता पवार,वैशाली शिंदे,यांनी विशेष परिश्रम घेतले.

अजून बातम्या वाचा..

जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकर शतकवीर तर मयंक भालेरावची अर्धशतकीय खेळी

जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकर शतकवीर तर मयंक भालेरावची अर्धशतकीय खेळी

  गुरुवार 01 मे 25 रोजी BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन क्रिकेट आसोसिएशन...

read more
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन अंडर 16 जिल्हास्तरीय क्रिकेट सामन्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकरची शतकीय खेळी हा – जिल्हास्तरीय सामण्यात पहिले शतक

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन अंडर 16 जिल्हास्तरीय क्रिकेट सामन्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकरची शतकीय खेळी हा – जिल्हास्तरीय सामण्यात पहिले शतक

  गुरुवार 1 मे 25 रोजी BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन क्रिकेट असोसिएशन...

read more
ग्रंथालयांच्या अडचणी सोडवण्यासाठी शासन प्रयत्नशील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

ग्रंथालयांच्या अडचणी सोडवण्यासाठी शासन प्रयत्नशील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

  पुणे - जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत ग्रंथालयांना अनुदान उपलब्ध करून देण्यासाठी, शासन प्रयत्न...

read more
आंतरराष्ट्रीय खेळाडू मुकुंद संतोष आहेर साईराज राजेश परदेशी यांना महाराष्ट्र शासनाचा जिल्हा गुणवंत खेळाडू पुरस्कार जाहीर

आंतरराष्ट्रीय खेळाडू मुकुंद संतोष आहेर साईराज राजेश परदेशी यांना महाराष्ट्र शासनाचा जिल्हा गुणवंत खेळाडू पुरस्कार जाहीर

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धांमध्ये सातत्याने उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मनमाड...

read more
.