loader image
[ays_poll id=7]

लासलगाव येथे मुस्लिम समाज सामूहिक विवाह सोहळ्यात १७ जोडप्यांचा विवाह – माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची उपस्थिती

Nov 20, 2022

लासलगाव – समाजातील गोर गरीब जनतेच्या हिताच्या दृष्टीने आणि समाजात एकात्मता वाढीसाठी सामुदायिक विवाह सोहळ्याची परंपरा अतिशय महत्वाची आहे. ही परंपरा संस्थेच्या वतीने कायम सुरू ठेवावी असे प्रतिपादन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले.

नाशिक जिल्हा मुस्लिम उत्कर्ष समिती,मुस्लिम फाऊंडेशन लासलगाव व नाज ए वतन बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने लोकनेते दत्ताजी पाटील विद्यालयाच्या प्रांगणात माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत सामुदायिक विवाह सोहळा संपन्न झाला. यावेळी नवविवाहित दाम्पत्यांना त्यांनी शुभेच्छा दिल्या. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी माजी मंत्री बबनराव घोलप, आमदार नरेंद्र दराडे, माजी आमदार कल्याणराव पाटील, मुंबई बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर, माजी सरपंच कुसुमताई होळकर, लासलगाव बाजार समितीच्या सभापती सुवर्णा जगताप, अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष अकबर शहा, माजी पंचायत समिती सदस्य शिवाजी सुरासे, ज्येष्ठ नेते अशोक होळकर, उपसरपंच रामनाथ शेजवळ, युवती शहराध्यक्ष सोनिया होळकर, तालुकाध्यक्ष मनीषा वाघ, पांडुरंग राऊत, मंगेश गवळी, बबन शिंदे, समितीचे जिल्हाध्यक्ष सादिक पठाण, नाशिक शहराध्यक्ष हनीफ बशीर,समितीचे समन्वयक तथा लासलगाव ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच अफजल शेख, हाजी बिसमिल्ला शहा, डॉ.मुज्जमिल मणियार अल्ताफ शहा, निसार शेख यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, संस्थेने सामूहिक विवाह सोहळ्याचे उचलेल हे पाऊल अतिशय कौतुकास्पद आहे. सामूहिक सोहळ्याने आयोजन ही काळाची गरज आहे. यामुळे विवाहाच्या खर्चातील बचत होऊन हा निधी नवदाम्पत्याला भावी आयुष्यात वाटचालीसाठी उपयोगी पडेल. तसेच गोर गरीब कुटुंबीयांना या सोहळ्यातून अधिक मदत होते असे त्यांनी सांगितले.

यावेळी ते म्हणाले की, फातिमा बी शेख यांचा आदर्श मुलींनी ठेवावा. अनेक अडचणींचा सामना करत त्यांनी सावित्रीबाई फुले यांना साथ देऊन महिलांना शिक्षण दिलं. त्यामुळे मुलींनी चांगले शिक्षण घेऊन स्वत:च्या पायावर उभे रहावे असे सांगत समाजातील एकात्मतेाठी तसेच चांगल्या समाजाच्या निर्मितीसाठी असे सोहळे होणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

या आयोजित सामूहिक विवाह सोहळ्यात १७ जोडप्यांचे विवाह लावून देण्यात आले. प्रत्येक विवाहित जोडप्याला संसार उपयोगी साहित्यही यावेळी संस्थेच्या वतीने देण्यात आले.

अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ : अस्मिता खेलो इंडिया महिला लीग मध्ये आकांक्षा व्यवहारे ने पटकावली तीन सुवर्णपदके

बघा व्हिडिओ : अस्मिता खेलो इंडिया महिला लीग मध्ये आकांक्षा व्यवहारे ने पटकावली तीन सुवर्णपदके

नगरोटा हिमाचल प्रदेश येथे सुरू असलेल्या अस्मिता खेलो इंडिया महिला लीग मध्ये ४५ किलो वजनी गटात ६०...

read more
सराफ सुवर्णकार बांधवांसाठी राज्य शासनाचे आश्वासक पाऊल – आयपीसी 411 अंतर्गत पोलीस अधिकाऱ्यांना सूचना

सराफ सुवर्णकार बांधवांसाठी राज्य शासनाचे आश्वासक पाऊल – आयपीसी 411 अंतर्गत पोलीस अधिकाऱ्यांना सूचना

राज्यातील सराफ सुवर्णकार बांधव जे सराफी व्यवसाय करतात त्यांच्या सुरक्षेबाबतच्या समस्यांचे निराकरण...

read more
आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या प्रयत्नातून साकोरा दगडवाडी व तीन वाड्या वस्ती साठी जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन संपन्न

आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या प्रयत्नातून साकोरा दगडवाडी व तीन वाड्या वस्ती साठी जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन संपन्न

  आमदार सुहास कांदे यांच्या प्रयत्नातून नांदगाव विधानसभा मतदार संघातील साकोरा ग्रामपंचायत...

read more
नांदगाव विधानसभा मतदार संघातील रणखेडा व बिरोळे येथे जलजीवन मिशन योजनेअंतर्गत प्रत्येकी ५० लाख रुपये किंमतीच्या दोन पाणीपुरवठा योजनांचे भूमिपूजन आमदार सुहास कांदे यांचे पुतणे किरण कांदे यांचे हस्ते आज करण्यात आले.

रणखेडा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या रामवाडी व बिरोळे ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या सतीचा माता...

read more
मनमाड शहरातील साडे पाच वर्षाची चिमुकली जैनब आत्तार ने कडाक्याच्या उन्हाळ्यात जीवनातील पहिला रोजा पूर्ण केला,

मनमाड शहरातील साडे पाच वर्षाची चिमुकली जैनब आत्तार ने कडाक्याच्या उन्हाळ्यात जीवनातील पहिला रोजा पूर्ण केला,

  मनमाड :- इस्लाम धर्मात पवित्र रमजान या महिन्याला अनन्य महत्व प्राप्त आहे. या महिन्यात सर्वच...

read more
.