मनमाड :- इस्लाम धर्मात पवित्र रमजान या महिन्याला अनन्य महत्व प्राप्त आहे. या महिन्यात सर्वच मुस्लिम बांधव यांच्यावर रोजा (उपवास) फर्ज (बंधनकार) असतात. लहान पासून ते मोठ्या व्यक्ती पर्यंत या रमजान महिन्यांमध्ये रोजा धरतात.
पालकांचे रोजा (उपवास) करतांना पाहून घरातील लहान मुलांनाही रोजा धरण्याची लालसा निर्माण होते. त्यामुळे लहान चिमुकले ही मोठ्यांचे अनुकरण करीत रोजा (उपवास) धरतात व पूर्ण करतात,
अशाच प्रकारे मनमाड शहरातील पत्रकार.आफरोज अत्तार यांची साडे पाच वर्ष्याची मुलगी जैनब आफरोज अत्तार या चिमुकली ने ही कडाक्याच्या उन्हाळ्यात
आपल्या जीवनातील पहिला रोजा दिनांक १२ मार्च मंगळवार रोजी पूर्ण केला आहे,
मुस्लिम समाजात पवित्र असणाऱ्या या महिन्यात संपूर्ण महिनाभर दिवसभर अन्न व पाणी न घेता हे रोजा (उपवास) ठेवला जातो या उष्णतेचा मोठ्या माणसांना देखील खूप त्रास होतो त्यात या साडे पाच वर्ष्याची चिमुकलीने पहिला रोजा ठेवून ईस्लाम धर्मानुसार आपल्या आयुष्यातील चांगल्या प्रकारे सुरुवात केलेली आहे,
रोजा (उपवास) केल्याबद्दल या साडे पाच वर्षीय चिमुकली जैनब अत्तार चा सर्वत्र कौतुक अभिनंदन होत आहे.