loader image
[ays_poll id=7]

महावितरणच्या लेखी आश्वासनानंतर राष्ट्रवादीचे आंदोलन स्थगित !

Nov 21, 2022

मनमाड शहरालगत असलेल्या कऱ्ही ग्रामपंचायत हद्दीतील घुगे वस्ती येथील डी.पी.हि गेल्या वर्षभरापासून नादुरुस्त आहे, त्यामुळे स्थानिक नागरिकांना तसेच शेतकरी बांधवाना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. डी.पी.बंद असल्यामुळे ऐन पावसाळ्यात शेतकर्यांना पिकांच्या नुकसानीला सामोरे जावे लागले आहे, वारंवार पाठपुरावा करून देखील महावितरणाने कोणत्याही प्रकारची कारवाई न केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मनमाड शहराच्या वतीने महावितरणाच्या एफ.सी.आय.रोड वरील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. महावितरणच्या विरोधी घोषणांनी आंदोलनास सुरुवात करण्यात आली. या नंतर महावितरणचे उप कार्यकारी अभियंता संदीप शिंदे यांनी दिलेल्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विजय पाटील, मनमाड शहराध्यक्ष दीपक गोगड, अल्प.तालुकाध्यक्ष हबीब शेख, युवक जिल्हा संघटक अमोल गांगुर्डे, श्रीराज कातकाडे, अक्षय देशमुख, आनंद बोथरा, नांदगावचे रामुदादा पवार, तानसेन जगताप, कऱ्ही येथील शेतकरी साईनाथ दराडे, सुधाकर घुगे, संजय घुगे, भाऊसाहेब लहिरे, प्रकाश पवार, दिलीप डोंगरे, अशोक राख, बापू लहिरे, अप्पा राख, पंतीराम घुगे, वाल्मिक लहिरे, भाऊसाहेब पवार, अण्णा सानप, केशव सानप, सागर लहिरे, भारत दराडे, सुनील लहिरे, आदि उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

फलक रेखाटन – श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा !

फलक रेखाटन – श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा !

फलक रेखाटन - श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा ! फलक रेखाटन...

read more
मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 21व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्म दिना निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात 30 रक्तदात्यांचे रक्तार्पण

मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 21व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्म दिना निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात 30 रक्तदात्यांचे रक्तार्पण

मनमाड - 79 व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्ये ला 14 ऑगस्ट या अखंड भारत दिना निमित्ताने...

read more
व्यसनाधीन तरुण देशाच्या शाश्वत विकासासाठी धोक्याचे जागतिक युवा दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात, पोस्टर रांगोळी व पथनाट्य यांचे सादरीकरण

व्यसनाधीन तरुण देशाच्या शाश्वत विकासासाठी धोक्याचे जागतिक युवा दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात, पोस्टर रांगोळी व पथनाट्य यांचे सादरीकरण

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या रेड रिबन क्लब, राष्ट्रीय...

read more
श्रावण मास अंगारक (मंगळी ) संकष्ट चतुर्थी निमित्त मंगळवार दिनांक 12/08/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रमा चे आयोजन

श्रावण मास अंगारक (मंगळी ) संकष्ट चतुर्थी निमित्त मंगळवार दिनांक 12/08/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रमा चे आयोजन

मनमाड - शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील...

read more
भारतीय जनता पार्टी मनमाड शहर प्रणित भाजप कामगार आघाडीच्या शहर शाखेच्या फलकाचे उदघाटन

भारतीय जनता पार्टी मनमाड शहर प्रणित भाजप कामगार आघाडीच्या शहर शाखेच्या फलकाचे उदघाटन

मनमाड - भारतीय जनता पार्टी देश स्तरावर विविध क्षेत्रामध्ये काम करीत असते कामगार क्षेत्रामध्ये...

read more
.