loader image
[ays_poll id=7]

मनमाड – चांदवड / चांदवड – मनमाड अतिरिक्त बसेस सुरू करण्याची राष्ट्रवादीची मागणी

Nov 22, 2022

कोरोना विषाणूचा प्रभाव कमी झाल्यापासून शैक्षणिक विभागातर्फे शाळा व कॉलेज पूर्ण क्षमतेने सुरु करण्यात आले आहेत. मनमाड शहरातून जवळपास ३०० ते ३५० विद्यार्थी शिक्षणासाठी मनमाड ते चांदवड रोज अपडाऊन करतात. बस आगाराच्या वतीने त्यांना मासिक पास देखील उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत, परंतु चांदवड जाण्यासाठी व परत येण्यासाठी मुबलक बस फेर्या उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असून त्यांच्या शिक्षणाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याची तक्रार काही पालकांद्वारे केली जात होती, याची दखल घेत मनमाड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मनमाड आगार व्यवस्थापक यांना निवेदन देत सदर बाब त्यांच्या लक्षात आणून देण्यात आली. सदर प्रश्न त्वरित मार्गी लावत सकाळी जाण्यासाठी व संध्याकाळी परत येण्यासाठी अतिरिक्त बसेसची व्यवस्था उच्च अधिकाऱ्यांची परवानगी घेऊन लवकरच सुरु करण्यात येथील असे आश्वासन आगार व्यवस्थापक यांच्या वतीने देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दीपक गोगड, माजी नगराध्यक्ष प्रकाश बोधक, अल्प.तालुकाध्यक्ष हबीब शेख, युवक जिल्हा संघटक अमोल गांगुर्डे, अल्प.शहराध्यक्ष अमोल काळे, संदीप पाटील, अक्षय देशमुख, आनंद बोथरा, प्रफुल निकम, नितीन आवारे, नितीन दंडगव्हाळ, आदि उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड, ता. नांदगाव,जि. नाशिक महाविद्यालयास ‘स्वायत्त दर्जा’ प्रदान

महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड, ता. नांदगाव,जि. नाशिक महाविद्यालयास ‘स्वायत्त दर्जा’ प्रदान

  मनमाड :- महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड,...

read more
व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजाभाऊ पारीक, अनिल पारीक आणि द्वारकेश पारीक ह्यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ बुधवारी मनमाड बंद

व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजाभाऊ पारीक, अनिल पारीक आणि द्वारकेश पारीक ह्यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ बुधवारी मनमाड बंद

मनमाड -- मनमाड शहर व्यापारी महासंघ चे अध्यक्ष राजाभाऊ पारीक तसेच त्यांचे लहान बंधू अनिल पारीक व...

read more
एक दिवशीय जिल्हास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत महामानव फॉउंडेशन,मालेगाव संघ विजेता.

एक दिवशीय जिल्हास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत महामानव फॉउंडेशन,मालेगाव संघ विजेता.

  मनमाड:-एम.एस.स्पोर्ट्स,मनमाड आयोजित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रेल्वे क्रिडांगण,मनमाड...

read more
मनमाडमधील धाडसी घरफोडी करणारे तीन सराईत गुन्हेगार अटकेत, १ कोटी ५ लाखांचा माल जप्त

मनमाडमधील धाडसी घरफोडी करणारे तीन सराईत गुन्हेगार अटकेत, १ कोटी ५ लाखांचा माल जप्त

मनमाड : मनमाड शहरातील डमरे कॉलनी परिसरातील व्यावसायिक मुर्तजा अब्दुल हुसेन रस्सीवाला यांच्या घरात...

read more
.