loader image
[ays_poll id=7]

राशी भविष्य : २३ नोव्हेंबर २०२२ – बुधवार

Nov 23, 2022


मेष : आज घर, कुटुंब व संतती यांच्या संबंधी आपणाला आनंद व संतोषाची भावना राहील. आज आप्तेष्ट व मित्र आपणाला घेरून टाकतील.

वृषभ : आज परदेशस्थ स्नेहीजनां कडून व मित्रवर्गा कडून आनंददायी बातम्या मिळाल्याने आपण आनंदित व्हाल. दूरच्या प्रवासाचे बेत आखाल.

मिथुन : आज कोणत्याही प्रकारच्या संकटा पासून बचाव होण्यासाठी रागावर नियंत्रण ठवावे लागेल.खर्च वाढल्याने आर्थिक चणचण भासेल.

कर्क : आज आपण मौज – मजा व मनोरंजन ह्यात गढून जाल. मित्र व कुटुंबीयांसह करमणूक केन्द्र किंवा पर्यटन स्थळी जाण्याची संधी मिळेल.

सिंह : आज उदासीन वृत्ती व संशयाचे काळे ढग आपल्या मनाला वेढून टाकतील. त्यामुळे मनःस्वास्थ्य लाभणार नाही. तरीही घरात शांततेचे वातावरण राहील.

कन्या : आजचा दिवस चिंता व उद्विग्नपूर्ण असून या ना त्या कारणाने काळजी वाढवेल. विशेषतः संतती व आरोग्य विषयक जास्त चिंता वाटेल.

तूळ : आज आपण खूप भावनाशील व्हाल व त्यामुळे मानसिक अस्वास्थ्य राहील. कौटुंबिक व जमीन – जुमल्या संबंधी चर्चा करताना दक्ष राहा.

वृश्चिक : आजचा दिवस कार्यात यश व आर्थिक लाभ मिळवून देणारा आहे. नवीन कार्याचा आरंभ करू शकता. भावंडांशी अधिक सहयोगपूर्ण व प्रेमाचे संबंध राहतील.

धनु : कामे पूर्ण व्हायला विलंब लागेल. महत्वाचे निर्णय घेणे हिताचे ठरणार नाही. कुटुंबियांचे गैरसमज होणार नाहीत यासाठी प्रयत्न करावे लागतील.

मकर : आजच्या दिवसाची सुरवात मंगल वातावरणाने होईल. एखादा मांगलिक प्रसंग घडेल. कौटुंबिक जीवनात आनंदी वातावरण राहील. आपले प्रत्येक काम सहजगत्या पूर्ण होईल.

कुंभ : आर्थिक व्यवहार तसेच जमीन – जुमल्यांच्या व्यवहारात आज कोणाला जामीन न राहणे हितावह राहील. मानसिक एकाग्रता राहील.

मीन : नोकरी – व्यवसायात उत्पन्न वाढेल. वडीलधारी व मित्रांकडून लाभ होईल. नवे मित्र मिळतील. त्यांची मैत्री भविष्यकाळात लाभदायक ठरेल.


अजून बातम्या वाचा..

.