loader image
[ays_poll id=7]

नांदगाव मतदार संघातील आदिवासी वस्ती व बंजारा तांड्यावरील सभामंडपाचे सौ.अंजुम कांदे यांच्या हस्ते संपन्न

Nov 26, 2022


मतदार संघातील प्रत्येक आदिवासी वस्ती व बंजारा तांड्यावरील सभामंडप चे भूमिपूजन सौ.अंजुम ताई कांदे यांच्या हस्ते संपन्न होत आहे.

आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या प्रयत्नातून मूलभूत सुविधा (25/15) अंतर्गत मतदार संघातील प्रत्येक आदिवासी वस्ती तसेच बंजारा तांडा वर सभा मंडप मंजूर करण्यात आलेले आहे. या सभा मंडपांचा भूमिपूजनाचा कार्यक्रम आज शनिवार दिनांक 26 नोव्हेंबर व उद्या रविवार दिनांक 27 नोव्हेंबर रोजी ठेवण्यात आलेला आह आज शनिवार रोजी मतदारसंघातील जवळपास 20 आदिवासी वस्ती व बंजारा तांडा येथील सभामंडपाचे भूमिपूजन करण्यात आले ढोल ताशांच्या गजरात औक्षण करत प्रत्येक गावागावात गावकऱ्यांनी सौ अंजुमताई कांदे यांचे स्वागत केले. आदिवासी महिला माय भगिनी व बालगोपाळांसोबत सौ अंजली कांदे यांनी संवाद साधला यावेळी उपस्थित महिलांच्या चेहऱ्यावरील आनंद स्पष्ट जाणवत होता. नांदगाव तालुक्यात आदिवासी वस्ती व बंजारा तांडा दीडशे सभागृह देण्यात येणार असून या सभागृहांमध्ये वधू वर कक्ष तसेच भोजन कक्षाची व्यवस्था असणार आहे. आमदार सुहास अण्णा कांदे यांनी प्रत्येक आदिवासी वस्तीवर तसेच बंजारा तांडा वस्तीवर सभागृह मंजूर केल्यानंतर त्वरित आपल्या स्वखर्चातून भगवान वीर एकलव्य तसेच संत सेवालाल महाराज यांची भव्य आकर्षक मूर्ती भेट दिली आहे तसेच या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा सोहळा अतिशय थाटामाटात नांदगाव येथे सर्व समाज बांधवांच्या उपस्थितीत मागील महिन्यात साजरा केला होता. आता लवकरच ही सभा मंडप बांधून तयार होतील आणि पुन्हा एकदा त्या सर्व मुर्त्यांची स्थापना त्याच उत्साहात करण्यात येणार आहे.


अजून बातम्या वाचा..

भाजपा मनमाड शहर मंडल तर्फे अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिन निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन

भाजपा मनमाड शहर मंडल तर्फे अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिन निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन

मनमाड - भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर 2014 मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या...

read more
रोटरी क्लब ऑफ मनमाड मॅजिक तर्फे मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर अनकाई येथे संपन्न

रोटरी क्लब ऑफ मनमाड मॅजिक तर्फे मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर अनकाई येथे संपन्न

  दिनांक 17 मंगळवार रोजी अनकाई येथे रोटरी क्लब ऑफ मनमाड मॅजिक आणि रोटरी आय हॉस्पिटल मालेगाव...

read more
महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड, ता. नांदगाव,जि. नाशिक महाविद्यालयास ‘स्वायत्त दर्जा’ प्रदान

महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड, ता. नांदगाव,जि. नाशिक महाविद्यालयास ‘स्वायत्त दर्जा’ प्रदान

  मनमाड :- महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड,...

read more
.